
चंद्रपुरात १६.२३ लाखांच्या एम.डी. ड्रग्जसह दोघे गजाआड!
दिनांक: २५ जून २०२६
ठिकाण: जटपुरा गेट परिसर, चंद्रपूर

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला जटपुरा गेट परिसरातील ‘इटनकर पान मंदिर’ जवळ एम.डी. (Mephedrone) या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे सापळा रचला.
या कारवाई दरम्यान ओम संतोष इटनकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याची आणि त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल आढळून आला. प्राथमिक चौकशीत ओमने हे ड्रग्ज इरफान उर्फ भुऱ्या पठाण याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दुसऱ्या आरोपीलाही अटक केली. ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे कारवाई केली.

या दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे NDPS Act, 1985 च्या कलम 8(c), 22(c) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या ड्रग्ज पुरवठ्याची साखळी (सप्लाय चेन) आणि आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास करत आहेत.
### अटक करण्यात आलेले आरोपी
-
ओम संतोष इटनकर (वय २५ वर्षे), रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर.

-
इरफान उर्फ भुऱ्या पठाण, रा. बागलखिडकी, चंद्रपूर.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
-
एम.डी. (Mephedrone) ड्रग्ज: १०४.२१० ग्रॅम

-
मोबाईल फोन: २ नग
-
रोख रक्कम: (नगदी)
-
एकूण जप्त किंमत: ₹१६,२३,३७०/- (सोळा लाख तेवीस हजार तीनशे सत्तर रुपये)
कारवाई करणारे पोलीस पथक
-
पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि): विनोद भुरले, सुनील गौरकार, संतोष निंभोरकर, डोके.
-
पोलीस हवादार (पोहवा): सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, सुनील आत्राम, छाया.
-
पोलीस अंमलदार (पोअं): हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रतीक हेमके, अपर्णा.
-
श्वान पथक (Dog Squad): पोहवा राजेश किन्नाके आणि विनोद चव्हाण.
-




