गोवंश कत्तलीप्रकरणी दोघांना अटक, ३० जनावरे व १० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


मोठी कारवाई: नागपूरमध्ये गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवणाऱ्या दोघांना अटक; ३० गोवंश जनावरे व १० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर:

गोवंशीय जनावरांना निर्दयीपणे व कुरूपणे कत्तलीकरिता कोंडून आणि बांधून ठेवणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३० लहान-मोठी गोवंशीय जनावरे, एक बोलेरो पिकअप वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण अंदाजे १०,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



घटना कशी घडली?

दिनांक ३०.१०.२०२६ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना त्यांना गोडगीदाम परिसरातील एका गल्लीत बोलेरो वाहनात गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.



या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचसमक्ष पंचांच्या उपस्थितीत रेड कारवाई केली. तेव्हा एक पांढरी बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH ३१ FC १२२१) आढळून आले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात गोवंशीय जनावरांना अत्यंत कुरूपणे व निर्दयीपणे दाटीवाटीने कोंडून, चारापाणी न देता कत्तलीकरिता बांधून ठेवल्याचे दिसून आले. तसेच जवळील एका खोलीची पाहणी केली असता, तिथेही काही गोवंशीय जनावरांना कोंडून बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले.



आरोपींची नावे:

चौकशी केली असता, ही जनावरे खालील आरोपींची असल्याचे निष्पन्न झाले: १. मोहम्मद अनिस अब्दुल हमीद कुरेशी (वय ४० वर्षे)

२. साबिर अय्युब कुरेशी (वय २७ वर्षे) (दोघेही रा. गडदीगोदाम मशिदजवळ, सदर, नागपूर)



३. मोहम्मद उमर मोहम्मद महबूब कुरेशी (वय ३५ वर्षे, रा. वायएमसी जिमजवळ, गडदीगोदाम, सदर, नागपूर) – (हा आरोपी पाहिजे असून याचा शोध सुरू आहे)

पोलिसांनी तात्काळ आरोपी क्र. १ आणि २ यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण ३० गोवंशीय जनावरे, १ मोबाईल फोन आणि बोलेरो वाहन जप्त केले आहे. सर्व जनावरे ‘गोशाळा धंतोली, नागपूर’ येथे दाखल करण्यात आली आहेत.



गुन्हा दाखल:

पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि सहकलम  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन व कामगिरी:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर विश्वास नागरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर  नविणचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन)  दीपक अग्रवाल, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)  वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्रीमती शुभांगी देशमुख, सपोनि चेतन बोरखेडे, पोउपनि मनोज राऊत, सफौ. गजेंद्रसिंग ठाकुर्, पोहवा नरेश तुमडाम, कमलेश गणेरे, महेंद्र सडमाके, प्रविण शेळके, सुरेश तेलेवार, अर्जुन यादव, मनिष टोंग, पोअं. संदीप पांडे, मंगल जाधव व प्रविण चव्हाण यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!