
SDPO वर्धा पथकाने टाकला अवैध दारु विक्रेत्यांवर छापा…
वर्धा उपविभागीय कार्यालयातील पथकाने पकडला विदेशी दारूचा साठा,वाहनांसह एकुन की 7,38,350/- रू चा मुद्देमाल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणारे शिवजयंतीचे निमित्ताने सर्व प्रभारी यांना सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने
दिनांक 14.02.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथक हे पोलिस उपविभागीय
कार्यालय वर्धा येथे कार्यालयीन कामकाज करीत असता गोपनिय माहीती मिळाली की जायका हॉटेलच्या मागे शिवनगरी येथे किरायाने असलेल्या खोलीवर रेड केला असता मौक्यावर


1) पियुष सुभाष जैस्वाल वय 26 वर्ष रा. वार्ड न. 5 गणेश नगर वर्धा जि. वर्धा

2) सौरभ जितेन्द्र भगत वय 23 वर्ष रा. वार्ड न. 3 गणेश नगर, बोरगांव मेघे, वर्धा जि. वर्धा

यांचेकडील किरायाचे घेतलेल्या खोली मधुन व त्याचे रूम समोर उभे असलेली त्यांची जुनी सिल्वर रगांची होन्डा सिटी
चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. 32 ए.एस. 7152 यांचे डिक्की मध्ये तसेच एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कपंनीची बर्गमॅन क्रमांक एम.एच. 32 ए.यु 5644 हीच्या डिक्की मध्ये वेगवेगळया कपंनीच्या विदेशी दारू च्या बाटल्या बियर दारूने भरलेली टिन कॅन असा एकुन दारू व एक चारचाकी वाहन, दुचाकी वाहन, एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकुन किंमत 7,38,350/-रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला
सदर आरोपींना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की सदर विदेशी दारूचा माल हा अमरावती जिल्हयातील विटाळा येथुन उदर बार मधुन आणला आहे त्याचे मालक अंकीत जयस्वाल रा. सावंगी मेघे वर्धा असे आहे. असे सांगीतल्याने बार मालक अंकीत जयस्वाल रा. सावंगी मेघे वर्धा यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा
जिल्हातील आरोपीस दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म. दा. का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने
सदर गुन्हयात बार मालक यास आरोपी बनविण्यात आले आहे.
पोलिस स्टेशन सावंगी मेधे येथे आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 111 / 2024 कलम 65 ई, 77 अ, 82, 83, म.दा.का. .अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सावंगी मेघे येथील पोलिस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे याचे विशेष मार्गदर्शनाखाली प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, रोशन पंडीत यांचे सुचनेप्रमाणे पो.उप. नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो. हवा. अमर लाखे, पो. शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर
शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


