नदीपात्रातुन वाळुचे अवैध उत्खनन करणांऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम…
पोलिस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील वर्धा नदीचे पात्रातुन अवैध वाळु उत्खनन करणाऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम,९५ लक्ष रु चे साहीत्य केले जप्त…..
अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध गौखनीज बाबत आपले धोरण आधीच स्पष्ट केले व तशा सुचनासुध्दा प्रत्येक प्रभारींना देण्यात आलेल्या आहेत त्याअनुषंगाने दि.(1) रोजी रात्री 02.00 वाजता ये दरम्यान वर्धा नदीचे काठावर असलेल्या साती घाटावर अल्लीपुर पोलिसांनी अवैद्य वाळु उत्खनन बाबत कार्यवाही करून घटनास्थळावरून वाळु वाहतुक करणारे एकुण 55,00,000/- रू किमतीचे 3 टिप्पर ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे जप्त करण्यात आले.
तसेच मागील काही दिवसांपासुन यवतमाळ जिल्ह्यातील वाळु तस्कर हे जिल्हा सिमेचे उल्लंघन करून वर्धा जिल्ह्यातील ग्राम कात्री लगत वर्धा नदीतुन बोटीचे व मशिनचे सहायाने वाळुचे अवैद्य उत्खणन करीत होते.त्याबाबत अल्लीपुर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचुन दि.(1) रोजी दुपारी 03.00
वाजताचे दरम्याण कात्री घाट येथे धडक कार्यवाही करून अवैद्यरीत्या वाळु उत्खणन करण्याकरीता वापरल्या जाणारी बोट व मशिनरी किमंत 5,00,000/- रू व पोकलॅन्ड मशिन किंमत 40,00,000/- रू असा एकुण 45,00,000/- रू चा मुद्देमाल ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी अल्लीपुर पोलिसांनी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करित आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुले, पो. हवा राहुल नव्हाते, नापोशि अनुप नाईक, प्रफुल चंदनखेडे,पोशि सतिश हांडे, योगेश चंदनखेडे,गणेश कन्नाके यांनी केली.