
हिंगणघाट डी बी पथकाने चौफेर कार्यवाही,दारुची वाहतुक करणारे केले जेरबंद….
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची चौफेर कार्यवाही,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात नाईटगस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम सिल्वर ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडीने दारूचा माल नंदोरी रोडने घेवून डांगरी वार्ड हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,


अशा खात्रीशीर माहितीवरुन मिळाल्याने सदर माहीती प्रभारी सपोनि संतोष शेगावकर यांना देवून त्याचे आदेशानुसार आंबेडकर शाळा चौक, हिंगणघाट येथे पथकासह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने तिथे एक इसम प्लाँस्टीक पन्नीमधे दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने पथकाचे मदतीने ज्युपीटर गाडीला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिल्याने त्याचे ताब्यातील वाहन थांबविल्यावर त्याने त्याचे नाव तुषार अशोकराव हुरले वय 19 वर्ष रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले त्याचे जवळ असलेल्या वाहनांची पाहणी केली असता वाहनाचा नोंदणी क्र. MH 32 AU 8287 किं. 80,000/- रू सदर मोपेड वाहनाचे पायदनावर 5 प्लाँस्टीकच्या मोठ्या पन्नीमध्ये प्रिमीयम नं. 1 कोकण देशी दारूच्या 90 मिलीच्या एकून 500 शिश्या प्रती शिशी 100 रू प्रमाने 50,000 रू असा जू.किं. 1,30,000 रू चा माल विना परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच दुसर्या एका कार्यवाहीत पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहीती नुसार संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा हर्षल उर्फ बाब्या धोटेकर हा त्याचे साथीदारा सह चारचाकी वाहन क्रमांक MH 02 BG 9815 वाहनामध्ये अवैधरित्या विदेशी दारूचा साठा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून रिठे काँलनी, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरच्या माहीतीची खात्री करुन प्रभारी सपोनि संतोष शेगावकर त्याचे आदेशाने रिठे काँलनी, हिंगणघाट येथे नाकाबंदी करुन. मिळालेल्या माहीती प्रमाणे चारचाकी वाहन क्रमांक MH 02 BG 9815 गाडी दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास थाबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे रोडवर न थांबविता समोर काही दुर अंतरावर नेवून वळन रस्त्यावर अंधाराचा फायदा घेवून गाडी सोडून पसार झाला.

सदर चारचाकी वाहनांची डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये विदेशी दारूने भरलेल्या ओसी ब्लू कंपनीचे विदेशी दारूचे एकून 7 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अश्या एकून 336 शिश्या, विदेशी दारूने भरलेल्या राँयल स्टँग कंपनीचे एकून 2 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अशा एकूण 96 शिशा, विदेशी दारूने भरलेल्या राँयल ग्रिन कंपनीचे 2 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अशा एकूण 96 शिशा व जूने वापरती रेनाल्ट कंपनीची चारचाकी वाहन जिचा नोंदणी क्र MH 02 BG 9815 असा एकून 6,18,000/- रू चा माल विना परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करुन पसार आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला
सदरच्या दोन्ही कार्यवाही.पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक. ठाणेदार पोलिस स्चेशन हिंगणघाट मनोज गभने यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, अजहर खान, नापोशि राहुल साठे,पोशि आशिष नेवारे,विजय काळे, अमोल तिजारे, मंगेश वाघमारे, शिवशंकर यादव यांनी केली. सदर दोन्ही गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलुस करत आहे.


