अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही…
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे पो. स्टे. देवळी हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करुन मोक्यावरून मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारुचा एकूण 08,16,800/- रू. चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत
देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी पदभार स्विकारल्यानंतर सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखेस अवैध धंदे त्यात मुख्यत्वे करुन दारु,गांजा,गुटखा,गोतस्करी यावर विशेष लक्ष देण्याचे व त्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार केली
त्याअनुषंगाने दि(29) ॲागस्ट 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची 02 पथके पोलिस स्टेशन . देवळी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ग्रे रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 32 सी 4188 चा चालक हा कळंब जिल्हा यवतमाळ येथून त्याचे ताब्यातील गाडीमध्ये देशी- विदेशी दारू चा मुद्देमाल घेऊन देवळी ते नांदोरा रोड ने येणार आहे अश्या माहिती वरून पंचासह देवळी ते नंदोरा रोडवर, सरकारी संडास जवळ, देवळी येथे सापळा रचून सदर ठिकाणी नाकेबंदी केली असता सदर वाहन येतांना दिसून येताच सदर वाहन चालकाला त्याचे ताब्यातील वाहन थांबविण्याचा इशारा देताच सदर वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रोडवर उभे करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला
त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही घटनास्थळावरून सदर स्विफ्ट चारचाकी गाडी चे मधल्या सीटवर व डिक्की मध्ये देशी विदेशी दारू 1) 11 खर्डाच्या खोक्यात आँफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 528 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने किंमत 1,84,800/- रू. 2) 01 खर्ड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने किंमत 16,800/- रू. 3) 06 खरड्याच्या खोक्यात संत्रा नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 288 सिलबंद शिश्या प्रती नग 150/-₹ प्रमाणे किंमत 43,200 /- रु, 4) 06 खर्ड्याच्या खोक्यात टॅंगो पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल.च्या 600 सिलबंद शिश्या प्रती नग 80/- रू प्रमाने किंमत 48,000/- रू. 5) 03 खर्ड्याच्या खोक्यात प्रीमियम कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल.च्या 300 सिलबंद शिश्या प्रती नग 80/- रू प्रमाने किंमत 24,000/- रू. 6) एक ग्रे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 32 सी. 4188 किमत 5,00,000 रू असा एकुण जु.कि. 8,16,800/- चा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीविरुध्द पो. स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,पोलिस निरीक्षक स्थागुशा विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनात पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे,दिपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.