
देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…
दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त……
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकास मिळाल्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोलिस
स्टेशन सावंगी (मेघे) येथील पोलिस स्टॉफसह वर्धा ते पुलगाव रोडवरील रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून नाकेबंदी केली असता एक मारुती सियाझ चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०४ एच.एम.-७९१२ हे मिळुन आल्याने सदर वाहनाची झडती घेतली त्यामध्ये ४,०५,४०० रु. चा देशी विदेशी दारुसाठा मिळुन आला


त्यावरुन गाडीचा चालक योगेश उर्फ सोनु मदनलाल विश्वकर्मा, वय ३३ वर्ष, रा. समता नगर, वर्धा यास ताब्यात घेवुन त्यास विचारपूस केली असता सदरचा दारुसाठा हा त्याने अंकित जयस्वाल रा. वर्धा याचे बारमधुन विकत आणल्याचे सांगीतल्याने वरील वाहनात मिळुन आलेला १) ४,०५, ४०० रु. चा देशी विदेशी दारुसाठा, २) आरोपीचे अंगझडतीतील नगदी ४०००/- रु.३) एक अॅप्पल कंपनीचा आयफोन कि. ८०,०००/- रु. व ४) एक मारुती सियाझ चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०४/एच.एम. – ७९१२ कि. ८,००,०००/- रु. असा एकुण १२,८९,४०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक व बार मालकाविरुध्द पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) येथील ठाणेदार सपोनि. संदिप कापडे व विशेष पथकातील पोलिस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथील पोलीस स्टॉफ यांनी केली.



