
लग्नसमारंभात चोरी करणारी आंतराज्यीय टोळीकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन रक्कम केली हस्तगत….
लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणा-या टोळीकडुन वर्धा येथील गुन्हा उघड करुन 1,20,000/- रू जप्त……
वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी(मेघे) जि. वर्धा यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल येथे चालु असतांना वधु व वरास नातेवाईकाकडुन शुभेच्छाच्या स्वरुपात देण्यात येणारे पैशांचे पाकीट 1,20,000/- रोख रुपये चे पर्स कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन नेली यावरुन अनिल जगन्नाथराव भोवरे यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन सेवाग्राम अप. क्र. 121/2025 भा. न्य. सं.2023 कलम 303(2) प्रमाणे नोंद करण्यात आला होता


तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना असे लक्षात आले की सदर गुन्हा अज्ञात आरोपीने केला असल्याने तो उघड आणण्याकरीता स्था.गु.शा वर्धा येथील पथक यांनी घटणास्थळी भेट देली असता गोपनीय बातमीदाराच्या माहीतीवरुन सदर गुन्हा भारताचे विविध राज्यात लग्नसमारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेश राज्य जिल्हा राजगड येथील कडीया सांसी या गावातील अंतरराज्य टोळीने एका अल्पवयीन मुलाचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले यावरुन स्था.गु.शा वर्धा येथील एक पथक बोडा पोलिस स्टेशन जिल्हा राजगड मध्य प्रदेश येथे रवाना होवुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने यातील आरोपी क्र. 1) बसंत कुमार घासीराम धपाणी वय 37 वर्ष . 2) हसंराच मनोज छायल वय 32 वर्ष, 3) अल्पवयीन मुलगा सर्व राहणार कडीया सांसी जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरच्या आरोपींना त्यांच्या गावात ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्यांना पोलिस आल्याची चाहुल लागताच गावातुन पसार झाले

वर नमुद आरोपीने गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाल बाबत गोपनीय माहीतीवरुन घरझडती घेतली असता आरोपीचा नातेवाईक अतुल सिसोदीया (जावई) रा. कडीया सांसी जि. राजगड यांचे घरझडतीत आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल वर्धा येथील चोरीस गेलेले नगदी 1,20,000/- रु मिळुन आले. ही चोरी केलेली रक्कम आरोपींनी अतुल च्या घरी ठेवली होती सदर रक्कम दि 04/04/2025 रोजी जप्ती पंचनामा करुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. तसेच पोलिस स्टेशन सेवाग्राम जि. वर्धा यांचा ताब्यात देण्यात आला. नमुद गुन्ह्यातील पसार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शानात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी प्रकाश लसुंते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि. शुभम राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


