
अवैधरित्या देशी दारुची खेप टाकणार्यावर पुलगाव पेलिसांची कार्यवाही….
पोलीस स्टेशन पुलगांव येथील पथकाची अवैद्य दारूसाठा वाहतुक करणार्यैवर मोठी कार्यवाही, चारचाकी वहनासह एकुण किंमत 5,48,000/- रू चा मुददेमाल जप्त….
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते मुख्यतः दारुबंदी नसलेल्या नजीकच्या जिल्ह्यातुन वर्धा जिल्ह्यात येणारा दारुसाठा,


त्याअनुषंगाने दि 11.जुलै .2025 रोजी पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन पुलगांव यशवंक सोलसे यांना गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम आपले चारचाकी वाहनातुन अवैधरित्या दारुचा साठा घेऊन जात आहे त्यानुसा नाकाबंदी लावुन पोस्टाफ सह यातील आरोपीवर नाकेबंदी दरम्यान प्रोरेड केला असता यातील आरोपीचे ताब्यात असलेल्या चारचाकी वाहणाची पंचासमक्ष झडती घेतली असता सिल्वर रंगाची मारोती कंपनीची स्विफ्ट कार गाडी क्रमांक एम.एच. ए.सी. 7393 मध्ये मागील शिटवर तसेच डिक्कीत 1) 05 खरडयाचे खोक्यात देशी दारू सिमला संत्रा कंपणीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 240 सिलबंद काचेच्या शिशा ज्यावर बॅच नं. 199 जुन 25 असा असुन प्रति नग 200/- रु. प्रमाणे कि. 48,000/- रु. 2) एक सिल्वर रंगाची मारोती कंपनीची स्विफ्ट कार किमत 500000/- रु जिचा दोन्ही बाजुने क्रमांक एम.एच. 40 ए.सी. 7393 असा क्रमांकांची कार असा एकुन किमत 5,48,000/- रू देशी दारूचा साठा मिळुन आल्याने आरोपी बबलू जोरांगरे, रा. विटाळा ता. धामणगाव, जिल्हा अमरावती याचे ताब्यातुन मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे देशी दारूचा माल जप्त करून ताब्यात घेतला.

तसेच यातील आरोपी क्र 2) शेख शाकीर उर्फ काल्या रा. टिळक नगर, पुलगांव (पसार) हा मोक्यावरून पसार झाला कलम 65 (अ) (ई), 77 (अ), 83 महाराश्ट्र दारूबंदी कायदा अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपास घेतला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुरांग जैन, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगांव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक यशवंत सोलसे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार विनोद रघाटाटे, अमोल बरडे, गोपाल बावणकर, राजु वैदय, अजय अनंतवार, सर्व नेमनुक पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा यांनी केली.
vivo Y335


