
पुष्पा स्टाईल ॲम्बुलन्समधुन विदेशी दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात….
दारूची वाहतूक करण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर करुन दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात….
सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०१)रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की एक ॲम्बुलन्स जिचा क्रमांक MH 34 BG 2803 ह्याने अवैधरित्या विदेशी दारुची तस्करी होणार आहे सदरची माहीतीची शहानिशा करुन ती सपोनि विनीत घागे,ठाणेदार पोलिस स्टेशन सेवाग्राम यांना देऊन त्यांचे सुचनेवरुन पवनार ते सेवाग्राम रोडवर नाकाबंदी केली असता


थोड्याच वेळाने सदर क्रमांकाची ॲम्बुलन्स येतांना दिसली तीस थांबवुन त्यातील ईसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सुरेंद्र उर्फे सोनु नामदेव चौधरी वय 37 वर्ष रा. वरुड ता. जि. वर्धा 2) किसना नरबाहादुर भिका वय 38 वर्ष रा. कंरजी रोड सेवाग्राम ता. जि. वर्धा 3) राजेंद्र लक्ष्णम इंगळे वय 47 वर्ष, रा. हावरे लेआउट सेवाग्राम ता.जि. वर्धा 4) गजानन गोविंद नेहारे वय 53 वर्ष रा. जुनीवस्ती सेवाग्राम ता. जि. वर्धा असे सांगितले यावरुन सदर ॲम्बुलन्स ची तपासनी केली असता

सदर वाहनात 1) एका कापडी पिशवीत विदेशी दारुने भरलेले ओ.सी. कंपनाचे 1000 एम.एल चे 2 बंपर प्रति बंपर 1000/- रु. प्रमाणे कि. 2000/- रु. 2) एक विदेशि दारूने भरलेला राँयल ग्रिन कंपनीचा 750 एम.एल चा बंपर कि. 1000/- रु. 3) विदेशी दारुने भरलेला ओ.सी. ब्ल्यु कंपनीच्या 180 एम. एल. च्या 20 निपा प्रति निप 250 रु. प्रमाणे कि. 5000/- रु. 4) विदेशी दारूने भरलेला राँयल स्टँग कंपनीच्या 180 एम. एल. च्या 62 निपा प्रति निप 300 रु. प्रमाणे कि. 18600/- रु. चा माल व 5) एक पांढ-या रंगाची बोलेरो ॲम्चाबुलन्स क्र. MH 34 BG 2803 कि . 5,00,000/- रु. असा कि. 5,26,600/- रु. चा माल. जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणात पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अप.क्र. 739 /24 कलम 65 (अ) (ई), 77 (अ), 83म.दा.का.सहकलम 130/177 मोवाका.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनीत घागे ठाणेदार पो.स्टे. सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पो हवा हरिदास काकड ना पो शि गजानन कठाणे पो शि अभय इंगळे प्रदीप कुचनकर यांनी केली.


