
समुद्रपुर पोलिसांचे हातात लागली तोतया पोलिसांची आंतराज्यिय टोळी…
समुद्रपुर : सवीस्तर व्रुत्त असे की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने जिल्य्हयात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी तसेच सर्व ठाणेदार यांना सतर्क पाहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा परीसरात व इतर जिल्ह्यात महामार्गावर मागील काही महिन्यापासून दोन ईसम हे पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन, ठकबाजी करुन महामार्गावरुन मोटर सायकलने प्रवास करीत असलेल्या वृध्द लोकांवर निशाना साधुन त्यांचे अंगावरील दागीणे पळविण्याचे गुन्हे करीत होते. त्याबाबत समुद्रपूर पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्याने, पोलिसांनी गुन्हेगारांचे वर्णन व मोटर सायकल बाबत माहिती प्राप्त केली होती. सदर माहितीच्या आधारे यातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांनी गुन्हे अन्वेषण पथक यांना वरील माहीतीच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेणेकरीता निर्देशीत करुन रवाना केले होते. सदर गुन्हे अन्वेषण पथक हे यातील गुन्हेगारांचा शोध घेत पेट्रोलींग करीत असतांना, दिनांक ३०.०९.२०२३ रोजी मौजा कानकाटी शिवारात प्राप्त वर्णनाचे दोन ईसम मोटर सायकलवर नागपूरकडे जातांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन थांबविण्याचा ईशारा केला असता, पोलिसांना पाहून दोन्ही गुन्हेगार पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करीत त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव
१) इमरान परवेज जाफरी, रा. चिद्री रोड, इराणी कॉलनी, बिदर, जि. बिदर, राज्य कर्नाटक, ह.मु. बिलाल मस्जीद जवळ, भानपूर, जि. भोपाल, राज्य मध्य प्रदेश,


२) तमस बिजय सुर्यवंशी, रा. बिलाल मस्जीद जवळ, भानपूर, जि. भोपाल, राज्य मध्य प्रदेश

असे सांगीतले. त्यानंतर त्यांना गुन्ह्यासंदर्भाने सखोल विचारपूस केली असता, त्यांनी वर्धा जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने, त्यांची ताब्यातुन एक मोटर सायकल क्रमांक AP-39/FS-6574 व मोबाईल कि. १,१०,००० रु. चा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात करुन पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर भादवि कलम ४२०,१७०,३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला असुन . गुन्ह्यातील अटक आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांचा दिनांक ०५.१०.२०२३ पर्यंत पोलिस कोठडी . मंजुर केली आहे. सदर गुन्हेगारांनी वर्धा जिल्ह्याचे अभिलेखावर पोलिस स्टेशन देवळी, सेलु, सावंगी, वडनेर, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) व नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, भिवापूर, काटोल तसेच कर्नाटक राज्यात बिदर जिल्हा व मध्यप्रदेश भोपाल मध्ये सुध्दा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची कबुली दिली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही. पोलिस अधीक्षक . नूरुल हसन, मा. अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, . उपविभागीय पोलिस अधिकारी . रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक . एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस अंमलदार अरविंद येनुरकर, रवि पुरोहीत, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे सर्व नेमणुक पोलिस स्टेशन समुद्रपूर यांनी केली.



