
गुप्तधनात सोने सापडल्याची बतावनी करुन १० लाखाची फसवनुक करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक..
समुद्रपुर(वर्धा) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी फिर्यादी नइमोदीन मोहीउददीन काज वय 63 वर्ष धंदा/कपडा दुकान रा.हुदा कॉलनी, विनबा वार्ड, चंद्रपुर यास आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हान वय 42 वर्ष धंदा मजुरी रा वानखेडे ले-आउट उमरेड, जि नागपुर याने त्याचे एका साथीदारासह फिर्यादीस खोदकाम मध्ये एक से दिड किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून ते 16,00,000 रू. मध्ये खरेदी करण्याबाबत म्हटले वरून फिर्यादी यांनी 8,00,000/- रू मध्ये सदरचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याबाबत सौदा ठरला असल्याने दि. 03/10/2023 रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा जुनैद परवेज असे त्यांचे क्रेटा गाडीने 8,00,000 रू व वेळेवर आवश्यक पडल्यास वाढवुन देण्यासाठी 2,00,000 रू असे एकुन 10,00,000/- घेवून आरोपीने सांगितलेप्रमाणे जाम चौरस्ता येथे आले. तेथे चहाचे टपरीवर फिर्यादी व आरोपी भेटले. तेव्हा फिर्यादीने आरोपीस नगदी 10,00,000 रु. देवून आरोपीकडून सोन्या सारखा दिसत असलेला हार घेतला व चंद्रपूर करीता परत निघाले. त्यानंतर फिर्यादीने गाडीमध्ये हाराची पाहणी केली असता, तो सोन्यासारखा दिसणारा नकली बनावटी असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांना समजुन आल्याने घडलेल्या घटनेची रिपोर्ट देण्यास पो.स्टे. ला हजर आले. फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. स्टे. समुद्रपूर येथे अप क. 703/23 कलम 420, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयाचे तपासात गोपनिय माहिती व फिर्यादी कडुन मोबाईल क्रमांक व इतर स्त्रोतांचा वापर करून आरोपीचा शोध सुरू केला असता गोपनिय माहिती मिळाली की, या प्रकारचे गुन्हे करणारी एक टोळी ही उमरेड परिसरात वास्तव्यास असुन त्यांच्या पैकी प्रभु चव्हान नामक इसम हा घटनेच्या दिवशी जाम परिसरात त्याच्या एका साथीदारासह पायदळ फिरत असतांना दिसला मिळालेल्या माहिती वरून पोस्टे उमरेड परिसरात आरोपीचा शोध घेतला असता संशयीत प्रभु चव्हान याच्या राहण्याच्या ठिकानाची माहिती मिळाली त्या माहिती वरून पोस्टॉप च्या मदतीने प्रभु चव्हान याचा शोध घेतला असता संशयीत प्रभु चव्हान
हा त्याचे काकाचे घरी मिळुन आला. त्याला ताब्यात घेवुन गुन्हाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हयातील 10,000,00 /- रूपये सुध्दा काढुन दिले. आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये असुन पुढील तपास सुरू आहे. तसेच दुस-या आरोपींचा शोध घेणे आहे. सुरू आहे
सदरची कार्यवाही .पोलिस अधिकक्षक वर्धा नुरूल हसन अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगनघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठानेदार संतोष
शेगावकर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अनिल देरकर, पंकज मेश्राम, सफौ विक्की मस्के डी.बी पथक पोहवा अरविंद येणुरकर, नापोशि रवि पुरोहित, सचिन भारशंकर, राजेश शेंडे व पोशि वैभव चरडे समुद्रपुर हे करत आहे.


