अवैधरित्या दारुच्या साठ्याची वाहतुक करणारा पोलिसांच्या ताब्यात,SDPO हिंगणघाट यांचे पथकाची कामगीरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वडनेर(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि 24-11-2023 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलिस आमदार अश्विन सुखदेवे ,स्वप्निल जीवने समीर कुरेशी, यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की

(1) शेख असरार शेख अकबर मिया रा. ताजबाग नगर डोरली रोड यवतमाळ,





(2) प्रफुल उर्फ पप्पू जीवतोडे ,रा. वडनेर



असे दोघेजण संगनमत करून विनापरवानगी  अवैधरित्या देशी दारूची चार चाकी तवेरा गाडीने वडनेर कडून मौजा फुकटा गावा कडे अवैध वाहतूक करीत आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी वर मौजा फुकटा येथे नाकेबंदी करून प्रो.रेड केला असता आरोपी शेख असरार शेख अकबर मिया वय 32 रां.यवतमाळ हा सिल्वर रंगाची शेवरलेट तवेरा कंपनीची चार चाकी कार क्रमांक MH 27 H 9020 ने विनापरवानगी अवैधरित्या देशी दारूची  वाहतूक करताना मिळून आला त्याचे सोबत गाडीत असलेला आरोपी क्रमांक दोन प्रफुल उर्फ पप्पू जीवतोडे राहणार वडनेर यास पोलिस असल्याची चाहूल लागताच गाडीचे दार उघडून पळून गेला आरोपी क्र 1 याचे ताब्यामधून 180 एम एल च्या देशी दारूने भरुन असलेल्या एकूण 5 खर्ड्याचे खोक्यात काचेच्या एकूण *240* शिश्या प्रति शिशी 150/- रू प्रमाणे *36,000/-* रू व कार कि *10,00,000/-* रू व एक स्मार्ट फोन की *10,000/-* रू असा ऐकून *जु कि 10,46,000/- रू* चा माल मिळुन आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येवुन आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये पो स्टे वडनेर येथे गुन्हा नोंद केला
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलीस अधिक्षक डॅा सागर कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित  यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकतील .पोलिस अंमलदार अश्विन सुखदेवे ,स्वप्निल जीवने समीर कुरेशी, यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!