
दुचाकी चोरी प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी फिर्यादीच्या पतीसह केली एकास अटक…
सेवाग्राम(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी दुर्गा रवींद्र पांडे, धंदा घरकाम रा. स्वागत कॉलनी वर्धा यांनी दि. 8/08/2023 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्या त्यांचे ओळखीचे प्रफुल शेंडे यांची मालकीची एक्टिवा 6G दुचाकी ने त्यांच्या पतीसह पवणार येथे शिव मंदिरात दर्शनाला तसेच बाजार घेण्याकरिता गेली असता बाजार चौक पवनार येथे गणेश मंदिर च्या बाजूला त्यांची ग्रे कलरची एक्टिवा 6G क्र MH 32 AT 8921 उभी करून बाजार घेण्याकरिता गेल्या, बाजार घेऊन परत आल्यावर त्यांना त्यांची एक्टिवा दिसून आली नाही करिता ती कोणीतरी चोरून नेल्याचे तक्रारीवरून पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अपराध क्रमांक 471/23 कलम 379 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन सेवाग्रामचे गुन्हे प्रकटीकरण पथक करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यांत चोरीस गेलेली एक्टिवा दुचाकी ही दशरथ कुराडे रा वडार झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा याने चोरलेली आहे करिता त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की रवींद्र पांडे हा त्याचा मित्र असून त्याने त्या गाडीची बनावट चाबी मला दिली व गाडी चोरण्यास सांगितले सदर गाडी फायनान्स वर आहे ति गाडी विकुन पैसै वाटुन घेवु असे सांगितले त्या चाबीचा वापर करून त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
करिता सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1) दशरथ चंदू कुराडे रा वडर झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा क्रमांक 2) रवी उर्फ रवींद्र रमेश प्रसाद पंडित राहणार कारला चौक वर्धा यांना अटक करून आरोपी क्रमांक 1) च्या ताब्यातुन चोरीस गेलेली एक्टिवा 6g जप्त करून गुन्हा उघडकीस आणला
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे पोलिस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, पोशि पवन झाडे अभय ईगळे नेमणुक पोलिस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.


