विनापरवाना अवैधरित्या बंदुक बाळगणार्यास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

घातक अग्निशस्त्र विनापरवाना बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक,एक देशी बनावटीची पिस्टल जप्त…

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मोहगव्हाण, ता.जि.वाशिम येथून एका २९ वर्षीय युवकास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई केली आहे.





दि.०२.०२.२०२४ रोजी वाशिम परिसरात व हद्दीमध्ये गस्त करत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत ग्राम मोहगव्हाण,ता.जि.वाशिम येथील इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र विनापरवाना बाळगून असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुषंगाने पंचासह सदर ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक सिल्व्हर रंगाची देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह अंदाजे किंमत १५,०००/- रुपये मिळून आली. सदर आरोपीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन बबन दंदे, वय २९ वर्षे, रा. मोहगव्हाण, ता.जि.वाशिम असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे प्राणघातक अग्निशस्त्र मिळून आल्याने सदर इसमाविरुद्ध पो.स्टे.अनसिंग येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.



सदर कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, पोहवा.विनोद सुर्वे, राजेश राठोड, आशिष बिडवे, नापोशि.राम नागुलकर, महेश वानखेडे,पोशि विठ्ठल सुर्वे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक .अनुज तारे (IPS) यांनी केले आहे.



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!