
अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
वाशिम(प्रतिनिधी) – वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याकरीता विशेष योजना राबवुन प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच आरोपीविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाह्या सुध्दा करण्यात आल्या.त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा, यांना मिळालेल्या गोपणीय माहितीद्वारे गांजाची तस्करी करणारे ईसम वाशिम जिल्हयात अंमली पदार्थ गांजाची विक्री करीता आणत असल्याबाबत खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ पथक रवाना करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.


सदर गांजा तस्करावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २१/०७/२०२५ रोजी वाशिम सापळा लावुन होते. दरम्यान दोन संशयीत ईसम दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळील बॅगेची झडती घेतली असता व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख शहेजाद शेख मुख्तार वय २५ वर्ष रा. सिव्हील लाईन वार्ड कं ०६ मालेगांव ता.मालेगांव जि. वाशीम २) मुश्ताक मोहम्मद रफिक वय ३३ वर्ष, रा. गांधी नगर मालेगांव ता. मालेगांव जि. वाशिम असे सांगीतले दोंघांचे जवळील बॅगची तपासनी केली असता आरोपी क्र १ याचे बॅगमध्ये ३.०२३ कि. ग्राम व २) याचे बॅगेत २.९९५ कि ग्राम असे दोघांजवळ गांजा सदृष्य अंमली पदार्थ एकुण ६.०१८ कि. ग्रॅम अंदाजे किंमत ९०,०००/- रुपये मिळुन आला

सदर अंमली पदार्थ गांजा र्पंचासमक्ष वजन करुन ताब्यात घेऊन. सदर इसमांनी गांजा सदृष अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बेकायदेशिररित्या बाळगला म्हणून त्याचे विरूध्द एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) २० व प्रमाणे कायदेशिर कार्यवाही करुन पो.स्टे. वाशिम शहर यांचे ताब्यात देण्यात आले

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधिक्षक लता फड, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी वाशिम नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी, सपोनि. योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार विनोद सुर्वे, गजानन झगरे, सुरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संतोष वाघ, संदीप दुतोंडे, शुभम चौधरी वैभव गाडवे यांनी केली


