
पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल
अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023
ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय आर पोर्टलवर अपलोड केले होते व पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन आजपर्यत गहाळ झालेले एकुन 248
मोबाईल अंदाजे किंमत 24,80,00/- रु चे हस्तगत केले
सदर ची कार्यवाही हि पोलिस अधिक्षक अनुज तारे,अप्पर पोलिस अधिक्षक भारत तांगडे उपविभागिय पोलिस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनात भुषन गावंडे पोलिस निरीक्षक सायबर सेल वाशिम पोशि वैभव गाडवे,महीला पोशि पुप्पा मनवर, यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे
या पुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दितील पोलिस स्टेशन येथे मोबाईल चे संपुर्ण कागदपत्रासह रीतसर तक्रार नोंदवावी सदर तक्रारीची योग्य
दखल घेण्यात येईल




