
दुध आणि ब्रेडची वाहतुक करतांना वणी पोलिसांना वाहनात आढळले भलतेच काही…
दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे वणी पोलिसांचे ताब्यात,वाहनांसह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
वणी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ११/०२/२०२४ रोजी सकाळचे सुमारास नवनियुक्त ठाणेदार पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून डि. बी पथकचे सपोनि माधव शिंदे व त्यांचे पथक यांना सकाळीच पाठवुन माहीती प्रमाणे वाहने चेक
करून कार्यवाही करणे बाबत दिलेल्या आदेशावरून गाडगेबाबा चौक येथील निकीता एजंसीज दुकाना जवळ एक पांढ-या रंगाचे वाहन ज्याचे कॅबीनचे वर व मागील बाजुस लाल अक्षरात दुधगंगा असे लिहीलेले टाटा कंपनीचा एल.पी.डी ४०७ मॉडेल ज्याचा क्रमांक MH-31 CQ-8815 वाहनात चालक नाव


१) सागर प्रकाश चौधरी वय २६ वर्ष व्यवसाय वाहन चालक रा. कोहमारा पोस्ट बाम्हणी ता.सडक अर्जुनी जि.गोंदीया ह.मु.खरबी चौक जय श्रीरामनगर नागपुर, व सोबतचा क्लिनर

२) प्रणय राजेश सावरकर वय ४१ वर्ष व्यवसाय मजुरी रा. सदभावना नगर प्लॉट नंबर ३७/३८ नागपुर पो.स्टे. नंदनवन नागपुर

असे दिसुन आले. सदर वाहनातील मागील डाल्याची पाहणी केली असता सदर वाहनात ब्रेड, दुध वाहुन नेण्याचे रिकामे झालेले प्लास्टीकचे एकुन ८५ नग ट्रे दिसले त्यामागे पांढ-या रंगाचे एकुन १३ (बोरी) गोणी दिसुन आल्या. त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखु, चा वास येत असल्याने नमुद वाहन चालक यास पंचासमक्ष विचारना केली असता त्यांनी सांगीतले की, नमुद गोनी मध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आहे. त्या मुळे नमुद चे वाहन व त्या मधील मुददेमालासह ताब्यात घेऊन घटनास्थळ पंचनामा करून पो.स्टे ला घेवुन आले व पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकरीता अन्न व सुरक्षा प्रशासन विभाग यवतमाळ अधिकारी यांना माहीती देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्री जि.पी दंदे यवतमाळ यांचे फिर्याद वरून कलम १८८, २७२,२७३,३२८,३४ भादवि सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखुचे २०० ग्राम वजनाचे ५२० डब्बे कि. ४,८६२००/- रू व वाहतुक करण्यास वापरलेला वाहन टाटा कंपनीचा एल.पी.डी. ४०७ मॉडेल ज्याचा क्रमांक MH-31-CQ-8815 कि.१०,०००००/- रू असा एकुन १४,८६,२००/- रू चा मुददेमान जप्त करण्यात आला असुन यातील नमुद आरोपी हे वाहन चालक व वाहक असुन त्यांनी आणलेला मुददेमाल कोठुनं व कोणाकडुन आणला तसेच कोणाला देणार होते याबाबत सखोल तपास करणे सुरू आहे.
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे उपविभागिय पोलिस अधिकारी.वणी, तसेच पोलिस निरिक्षक अनिल बेहेरानी ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, सफौ सुदर्शन वानोळे, नापोशि पंकज उंबरकर, पोशि विशाल गेडाम, श्याम राठोड,मो. वसिम,गजानन कुडमेथे यांनी केली.


