यवतमाळ येथील घरफोडीचा आरोपी स्थागुशा पथकाचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्या होत्या.त्यानुसार
दिनांक १०/०२/२०२४ रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशानुसार स्यागुशा चे पथक अवघड गुन्हयाचे समांतर तपासकामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मीळाली की, रेकॉर्डवरील सराईत इसम नामे रवि मेश्राम रा. शिंदे नगर यवतमाळ याने चोरी केली असुन तो मागील दोन दिवसांपासुन खुप
पैसे खर्च करीत आहे व तो आझाद मैदान परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागीणे विक्री करीता फिरत आहे. अशा माहितीवरुन त्याचा शोध घेवुन रवि लक्ष्मण मेश्राम वय २५ वर्ष रा. शिंदे नगर यवतमाळ यास स्थागुशाचे पथकाने ताब्यात घेऊन  विचारपुस केली असता आरोपी इसम नामे याने चापनवाडी यथे घरफोडी केल्याची कबुली देवून गुन्हयात चोरी केलेले १) सोन्याचे दागीणे वजन १५.७४० ग्रॅम कि बाजार भावाप्रमाणे ९२८००/- रु २) चांदीचे शिक्के, चांदीच्या वस्तु वजन २६४.७७० ग्रॅम कि बाजार भावाप्रमाणे १८,५००/- रु चा असा एकुण १,११,३००/- रु चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद प्रकरणात पोलिस स्टेशन अवधुवतवाडी येथील अपराध क्रमांक ७८/२०२४ कलम ४५४, ४५७,३८० भादवि चा गुन्हा उघडकीस आला असुन गुन्हयातील आरोपीस पुढील तपासकामी पोलिस स्टेशन अवधुतवाडीचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि धनंजय हाके, पोलिस अंमलदार बंडु डांगे, सैयद साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे चालक पोशि योगेश टेकाम यांचे पथकाने पार पाडली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!