
वाळुची चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा हद्दीतुन अवैधरित्या रेती(वाळु) ची वाहतुक करणारे ०२ टिप्पर घेतले ताब्यात,९६,४८,०००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….
पांढरकवडा(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी गंभीर गुन्हे व त्यातील पाहीजे असलेले आरोपी याबाबत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक ०७/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलींग करीत असतांना ०१ / ३० वा. सुमारास पथकास गोपणीय माहिती मिळाली की, पैनगंगा नदी
पिंपळखुटी येथुन अवैधरित्या रेती वाहतुक करणारे टिप्पर पांढरकवडाचे दिशेने येणार आहेत अशा माहिती वरुन पथकाने
माहितीची शहानिशा करणे करीता तात्काळ ग्राम गोंडवाकडी समोरील रोडवर सापळा लावुन थांबले असतांना माहिती प्रमाणे
एक सहा चाकी टिप्पर येतांना दिसल्याने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर टिपर चालकाने हायवे रोडने असलेल्या
सागर हॉटेल चे दिशेने वाहन वळवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला त्याच प्रमाणे त्याचे मागे येणा-या दुसत्या टिपरने सुध्दा त्याच
टिप्पर मागे वळुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता पथकातील अधिकारी अंमलदार यांनी नमुद दोन्ही टिप्पर वाहनास थांबवुन वाहनांची पाहाणी केली असता त्यात गौण खनिज रेती (वाळु) असल्याची खात्री झाल्याने टिप्पर क्रमांक एम. एच. ४०
बि.एल ४४६२ व एम.एच. ३१ सि.बी. ८०५२ मधील दोन्ही वाहन चालकांस त्यांचा नांव पत्ता विचारला असता त्यांनी अनुक्रमे


१) लिंकेश्वर महादेव मरापे वय ५२ वर्षे, रा. निलजई ता. केळापुर जि. यवतमाळ,

२) प्रमोद महादेव जुनघरे वय २५ वर्षे, रा. कोंघारा ता. केळापुर जि. यवतमाळ

असे असल्याचे सांगीतल्याने नमुद वाहनांची पाहाणी केली असता दोन्ही वाहनात ०४ ब्रास अशी एकुण ०८ ब्रास रेती किमंत ४८,००० रु ची अवैधरित्या कोणताही परवाणा नसतांना आढळुन आल्याने सदरची रेती व दोन्ही वाहने किमंत प्रत्येकी ८,००,०००/रु असा एकुण १६,४८,०००/रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी विरुध्द पोलिस ठाणे पांढरकवडा येथे भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्था. गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


