कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली सुटका…
आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 01/11/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक आणी पोलिस स्टेशन परिसरात रात्रगस्त दरम्याण पेट्रोलींग करीत असतांना पहाटे 03/00 वाजन्याचे सुमारास गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीलायक खबर मिळाली की एक 10 चाकी ट्रक क्रमांक एम.एच. 49- 0537 मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावर कोंबुन कत्तली करीता यवतमाळ, आणी मार्गे हातगांव नांदेड कडे जाणार आहेत. अशा खबरेवरुन स्था. गु.शा. कडील पथकाने नागपुर तुळजापुर हायवे रोडवरील राजेश्वर प्रोटीन्स प्रा. लि. दत्तरामपुर ता. आर्णी समोरील रोडवर नाकाबंदी केली असता पहाटे 07/00 वा. सुमारास माहिती प्रमाणे 10 चाकी ट्रक यवतमाळ रोडने आणींकडे येतांना दिसल्याने पथकाने ट्रक थांबवून पाहाणी केली असता ट्रक मध्ये लहान मोठे गोवंशीय बैल एकमेकांच्या पायाला पाय आखुड दोरीने बांधून दाटीवाटीने वाहनाचे मागील पल्ल्याला दोरीने बांधुन त्यांना हालचाल करण्याकरीता पुरेशी जागा नसलेल्या अवस्थेत निर्देयतेने कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता कोंबुन असल्याचे दिसले वरुन ट्रक मधील गोवंशीय जनावरांना मुक्त करुन पाहानी केली असता 23 नग गोवंशीय बैल आढळुन आल्याने ट्रक मधील इसम
1) धनशाम मदन पाल वय 36 वर्षे, (चालक) रा. लाल झेंडा चौक यशोधरा नगर, नागपुर,
2) मोहम्मद अजहर दाउद कुरेशी वय 19 रा.शारदा कंपनी चौक, कामठीरोड तबरेज नगर नागपुर,
3) गुलाम रसुल मोहम्मद आले नबी वय 32 वर्षे, रा. टेकानाका
कपील नगर, नागपुर
यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदरची गोवंशीय जनावरे ही
1) शफीक खान 2)नासीर खान दोन्ही रा. बुडडाजी नगर, नागपुर
याचे सांगणे वरुन नागपुर कन्हान येथुन हातगांव जि. नांदेड येथे घेवून जात असल्याचे सांगीतले असुन सदर जनावरांचे वाहतुकी बाबत परवान्याची विचारणा केली असता त्यांनी नसल्याचे सांगीतल्याने सदरचे एकुण 23 नग गोवंशीय बैल, आरोपींची अंगझडतीमधुन मिळालेले 03 मोबाईल व वाहन असा एकुण 19,81,000/- रु चा मुद्देमाल जप्त करुन जनावरांची पशु वैद्यकिय अधिकारी यांचेकडुन तपासणी करुन घेवून सुरक्षा व चारापाणी व्यवस्थे करीता गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले असुन नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही. पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, आधासिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था. गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गणेश वनारे, सपोनि विवेक देशमुख, पोलीस अंमलदार बंडु डांगे, सैयद साजीद, रुपेश पाली, मोहंमद चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल बेग, रितुराज मेडवे, अमीत झेंडेकर, धनंजय श्रीरामे, अमीत कुमरे सर्व स्था. गु. शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
4