
स्थानिक गुन्हे शाखेने शेतमाल चोरीचा गुन्हा केला उघड…
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस ठाणे कळंब हद्दीतील शेतमाल चोरीचे गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन त्यांचेकडुन ५,२५,३२०/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक यवतमाळ शहरात उघड न झालेल्या गुन्हयातील संशयीत आरोपी तसेच पाहिजे असलेले फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, सचिन पाटील व वैभव दुदुरकर दोन्ही रा. सोनेगांव ता. कळंब हे शेत शिवारातुन चोरुन आणलेली तुर व हळद कारंजा येथे विक्री करुन चोरीचा माल वाहतुक करण्याकरीता वापरलेल्या बोलेरो
वाहनासह शारदा चौक येथे आलेले आहेत.


अशा खात्रीशीर खबरे वरुन पथकाने तात्काळ शारदा चौक गाठुन संशयीत इसम १) सचिन राजेंद्र पाटील वय ३३ वर्षे, २) वैभव उर्फ रुपेश मोहनराव दुदुरकर वय ३० वर्षे, दोन्ही रा. सोनेगांव ता. कळंब यांना ताब्यात घेवुन ते पो.स्टे. कळंब अपराध क्रमांक २०१२/ २०२४ कलम ४५७, ३८० भादवि गुन्हयात संशयीत असल्याने त्यांचेकडे सदर गुन्हयासंबधाने कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्यांनी पोलिस ठाणे कळंब हद्दीतील माणिक रुईकर यांचे सोनेगांव शेतशिवारात असलेल्या शेतातील हळद व तुर चोरीचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन चोरीतील ०२ कट्टे तुर व १७ कट्टे हळद कारंजा येथे विक्री केली असल्याचे सांगीतले वरुन नमुद आरोपींकडुन गुन्हयात वापरलेले वाहन बोलेरो पिकअप एम.एच. ३२ क्यु ३९०९ तसेच त्यांनी कारंजा येथील अडत व्यापारी यांना विक्री केलेली ८६३ किलो हळद व १२० किलो तुर असा एकुण ५,२५,३२० /- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपी नामे १) सचिन राजेंद्र पाटील वय ३३ वर्षे, २) वैभव उर्फ रुपेश मोहनराव दुदुरकर वय ३० वर्षे, दोन्ही रा. सोनेगांव ता. कळंब व मुद्देमाल पुढील तपासकामी पो.स्टे. कळंब यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार बंडु डांगे, निलेश राठोड, किशोर झेंडेकर, आकाश सहारे, योगेश टेकाम सर्व स्था. गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



