अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
पुसद शहर पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारे दोन ईसमास ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण उघड न झालेले गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यवतमाळ यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसद परिसरात कॅम्प करुन असतांना आज दिनांक २८/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पहाटे सुमारास गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नामे सचिन अशोक राउत रा. भिमनगर, काकडदाती पुसद व शुभम रमेश राउत यांच्या जवळ गावटी बनावटीची पिस्टल (कट्टा) असुन तो त्याचे घरी असल्याचे अशा विश्वसनीय माहिती वरुन पथकाने तात्काळ काकडदातील पुसद येथे पोहचुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता सचिन अशोक राउत यांचे घरी पंचासह घरझडती कामी गेले असतांना नमुद इसमास ताब्यात घेवुन गावठी पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन बंदुक चुलत भाऊ शुभम याचेकडे असल्याचे सांगुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पो.स्टाफ चे मदतीने त्यास अटकाव करुन लागलीच शुभम रमेश राउत यास ताब्यात घेवुन नमुद दोघांनाही गावटी पिस्टल बाबत विचारपुस केली असता सचिन राउत याने सांगीतले की काही दिवसांपुर्वी त्यांनी गावटी पिस्टलने फायरिंगची प्रॅक्टीस केली होती व ती पिस्टल घराचे पाठीमागील स्वयंपाक खोलीचे शेड मध्ये ठेवली असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणाची पाहाणी केली असता स्वयंपाक खोलीचे शेड मधील एका पिशवी मधुन एक गावटी बनावटीची पिस्टल ( देशी कट्टा) किमंत ३०,००० /-रु व ०२ नग पितळी काडतुस किमंत १०००/- रु असा एकुण ३१,००० रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी १) सचिन अशोक राउत वय २५ वर्षे, २) शुभम रमेश राउत वय २६ वर्षे, दोन्ही रा. भिमनगर बुध्दविहार जवळ काकडदाती पुसद यांचे विरुध्द पोलिस स्टेशन पुसद शहर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप,आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत , पोलिस अंमलदार सुभाष जाधव, तेजाब रणखांब, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहंमद ताज, सर्व स्थागुशा यवतमाळ, व मपोशी इंदु पवार पो.स्टे. पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.