
श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त पोलिस अधिक्षकांचे यवतमाळ जिल्हा वासीयांना आवाहन…
श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमीत्त यवतमाळ पोलिसांचे नागरिकांना आवाहन…
यवतमाळ (प्रतिनिधी)- उद्या अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतीष्ठा लोकार्पण सोहळा होत आहे त्या निमीत्ताने यवतमाळ जिल्हयामधे होणारे विविध कार्यक्रम शातंतेने साजरे करुन कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अनुचित घटना घडू नये त्या साठी योग्य ती खबरदारी म्हणुन यवतमाळ जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.


उद्या (दि.२२जानेवारी) रोजी अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा निमित्य संपुर्ण यवतमाळ जिल्हयामध्ये विविध जाती धर्माकडुन उत्सव आनंदात साजरा करण्यात येत असुन त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक विशेषत हिंदु धर्मामधे मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असुन यवतमाळ जिल्हा पोलीस दलामार्फत शांतता समीती, मोहला समिती च्या बैठकी घेवुन सर्व जाती धर्माना शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले असता सर्व जाती धर्माचे नागरीक सहकार्य करीत आहे. तसेच यवतमाळ जिल्हयातील पोलिस स्टेशन अंतर्गत विविध शहरामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्टा लोकार्पन सोहळा निर्मीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन त्यामध्ये शांतता भंग होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता हर्षोल्लासात व्हावे. याकरीता श्रीराम प्राणप्रतिष्टा लोकार्पन सोहळा निमीत्ताने यवतमाळ जिल्हा पोलिस दलाचे वतीने जिल्हयात ०१ अपर पोलिस अधिक्षक, ०७ उपविभागीय पोलिस अधिकारी, २३ पोलिस निरीक्षक, ११९ सहायक पोलिस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ९०५ अमलदार, ४५ नवप्रविष्ट अंमलदार QRT चे ०२ पथक, RCP चे ०४ पथक, असे एकुण १५० अधिकारी, १०५८ अंमलदार व ७०० ग्रुहरक्षक दलाचे जवान असा वरील प्रमाणे पोलिस बंदोबस्त पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण यवतमाळ जिल्हयात नेमण्यात आलेला आहे. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आलेले असुन सतत पायी व वाहनाने पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवुन समाज विघातक कृत्य केल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा लोकार्पन सोहळा निमीत्ताने यवतमाळ जिल्हयामधे होणारे विविध कार्यक्रम शातंतेने साजरे करुन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.



