
जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी वर्षाभरातील उत्कुष्ट अधिकारी म्हनुन सन्मानित…
सन २०२३ मध्ये MPDA अंतर्गत १२ प्रस्ताव सादर करणारे पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व अग्नीशस्त्रा संबधी ०५ कारवाई नोंद करणारे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड यांनी केले ‘ऑफीसर ऑफ द ईयर ”पुरस्काराने सन्मानित….
यवतमाळ – दिनांक १५/१२/२०२३ रोजी पोलुस मुख्यालय, यवतमाळ येथील प्रेरणा हॉल येथे जिल्हा पोलिसांची मासिक
गुन्हे सभा पार पडली मासिक गुन्हे सभेमध्ये डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी जिल्हयातील पोलिस स्टेशन मधील कामकाज व गुन्हे आढावा यासह विशेष कामगिरी व उत्कृष्ट डिटेक्शन करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचा प्रमाणपत्र देवून गौरव सुध्दा केला.. स्थानिक गुन्हे शाखेत मागील सहा महिण्यांपासुन नेमणुकीस असलेले सपोनि संतोष मनवर यांनी सन २०२३ मध्ये पो.स्टे. यवतमाळ शहर, घाटंजी, बाभुळगांव हद्दीतील कुख्यात ०५ गुन्हेगारांकडुन ०५ अग्नीशस्त्र व ०६ जिवंत काडतुस जप्त करुन वेगवेगळी कारवाई नोंद केली तसेच पो.स्टे. लाडखेड येथील क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला तसेच पो.स्टे. अवधुतवाडी येथील खुनाच्या गुन्हयातील पाच फरार आरोपीतांना अटक केली,घरफोडीचे तिन गुन्हे उघडकीस आणुन ६,०५,००० रु चा मुद्देमाल हस्तगत केला त्याचप्रमाणे अवैध बाजारात विक्री करीता जाणारा २० टन तांदुळ जप्त केला, या सारख्या व इतर ही विशेष कामगिरी केल्या असल्याने पोलिस अधीक्षक यांनी त्यांना सन २०२३ या वर्षाकरीता ‘ऑफीसर ऑफ द ईयर’ हा सन्मान व प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले.
त्याच प्रमाणे पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे नेमणुकीस असलेले व त्यापुर्वी बिटरगांव पो.स्टे. प्रभारी असलेले सपोनि प्रताप भोस यांनी सन २०२३ मध्ये पो.स्टे. बिटरगांव हद्दीतील ०३ धोकादायक इसमांविरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत प्रस्ताव सादर केलेत त्यानंतर त्यांची नियुक्ती पो.स्टे. अवधुतवाडी येथे झाल्या नंतर पो.स्टे. अवधुतवाडी हद्दीतील धोकादायक व्यक्ती विरुध्द एकुण ०९ एम.पी.डी.ए. अंतर्गत प्रस्ताव तयार करुन सादर केले आहेत. सन २०२३ मध्ये यवतमाळ जिल्हा पोलिस दला कडुन जिल्हादंडाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या एम. पी.डी.ए. प्रस्तावापैकी सर्वाधिक १२ प्रस्ताव हे सपोनि प्रताप भोस यांनी तयार केले आहेत त्यांच्या या विशेष कामगिरी करीता पोलिस अधीक्षक यांनी त्यांना सन २०२३ या वर्षाकरीता ‘ऑफीसर ऑफ द ईयर’ हा सन्मान व प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले आहे…
जिल्हयातील अधिकारी, अंमलदार यांना अधिक स्फुर्तीने काम करण्याची प्रेरणा मिळावी तसेच अधिकारी अंमलदार यांचे कडुन अधिक प्रभावी कामकाज व्हावे या उद्देशाने विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांना विशेष कामगिरी करीता प्रमाणपत्र देवून सन्मानीत करणे तसेच विशेष कामगिरी करणारे अधिकारी यांना ‘ऑफीसर ऑफ द ईयर’ हा सन्मान देण्याचा प्रघात नव्याने सुरु केला आहे.




