दिग्रस येथे ६ धारदार तलवारींसह २५ वर्षीय तरुणाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने दिग्रस तालुक्यातील हरसुल येथे छापा टाकून ६ धारदार लोखंडी तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्य तपशील:



  • आरोपीचे नाव: गणेश गजानन अंभोरे (वय २५ वर्षे, रा. हरसुल, ता. दिग्रस, जि. यवतमाळ).

  • जप्त मुद्देमाल: पोत्यात लपवून ठेवलेल्या ६ चंद्राकार आकाराच्या, टोकदार व एका बाजूस धार असलेल्या लोखंडी तलवारी (अंदाजे किंमत ₹६,०००/-).



  • कारवाईची तारीख: २५ ऑगस्ट २०२६.

घटनेचा तपशील: स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २५ ऑगस्ट रोजी पो.स्टे. दिग्रस हद्दीत गस्त घालत असताना, गणेश अंभोरे याने आपल्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे धारदार तलवारी बाळगल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष हरसुल येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, खोलीत पोत्यात लपवून ठेवलेल्या ६ तलवारी आढळून आल्या.



पोलीस कारवाई: या प्रकरणी आरोपी गणेश अंभोरे याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे अपराध क्रमांक ७१६/२०२६, भारतीय शस्त्र कायदा (Arms Act) कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिग्रस पोलीस करत आहेत.

कारवाई करणारे पथक:



सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  अशोक थोरात आणि एल.आय.सी. शाखा पोलीस निरीक्षक  सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोलीस अंमलदार सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, सचिन मलाये, पवन ढवळे, अमित झेंडेकर व चालक अमित कुमरे यांनी सहभाग नोंदवला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!