
जळगाव LCB चे वरीष्ठ पोलिस निरीक्षकास गोतस्कराकडुन जिवे मारण्याचा प्रयत्न,थोडक्यात बचावले….
जळगाव पोलिस दलातील वरीष्ठ पेलिस अधिकारी यांचेवर गोतस्करांचा जिवघेणा हल्ला,थोडक्यात बचावले….
जळगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात जळगाव पोलिस एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. जळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार जिवे मारण्याचा प्रयत्न केला वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. संदीप पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमध्ये संदीप पाटील थोडक्यात बचावले असून त्यांना बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे.



गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानी आरोपींनी चारचाकी वाहन रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांचेकडुन चोरीस गेलेला बैल तसेच चार चाकी वाहन तसेच छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे आपले पथकासह जळगाव जिल्ह्यात गस्त घालत असताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ते मुक्ताईनगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला तसेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आरोपी वाहनासह पसार झाले. या दरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तब्बल 100 किलोमीटर पर्यंत जळगाव ते अकोल्यापर्यंत आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला.व अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने वाहन रिव्हर्स घेऊन पोलिस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिस निरीक्षक संदीप पाटील खाली पडले. त्यानंतर त्यांनी आहे त्या अवस्थेत उभे राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान इतर तिघे फरार झाले. घटनेत पोलिस निरीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




