सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई; विहिरीतील मोटार चोरणारी टोळी जेरबंद!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: विहिरीतील मोटार चोरणारी टोळी गजाआड; ६.४३ लाखांचा माल जप्त

वर्धा / सेवाग्राम: सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येसंबा आणि पुजई शिवारातील शेतांमधून विहिरीतील पाण्याचे पंप (सबमर्सिबल मोटर्स) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात सेवाग्राम पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १० मोटर्स, एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक मोटारसायकल असा एकूण ६,४३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर यशस्वी कारवाई वर्ध्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि तक्रार

या प्रकरणातील फिर्यादी वैभव दिनेश राउत (वय २२ वर्षे, रा. येसंबा, ता.जि. वर्धा) यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २७२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी वैभव राऊत आणि त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीतून अज्ञात चोरांनी अंदाजे ३२,००० रुपये किमतीच्या एकूण ९ सबमर्सिबल मोटार मशीन आणि १ पाण्याची वरील मोटर अशा एकूण १० मोटर्स चोरून नेल्या होत्या.

पोलिसांचा तपास आणि आरोपींना अटक

गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी येसंबा आणि पुजई शिवारातून या चोरीची कबुली दिली.



अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) सागर रामदासजी मानकर (वय ३२ वर्षे, रा. रुईखैरी, ता.जि. नागपूर) २) रामकृष्ण उर्फ गौरव प्रमोद हिवंज (वय ३४ वर्षे, रा. येसंबा, ता.जि. वर्धा) ३) वैभव गणपत सोनटक्के (वय २८ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिर, बुटीबोरी, ता.जिल्हा नागपूर) ४) मयुर राजेश उईके (वय २५ वर्षे, रा. हेटीवाही, ता. हिंगणा, ह.मु. रुईखैरी, ता.जिल्हा नागपूर)

६,४३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या विहिरीतील ९ सबमर्सिबल मोटर्स आणि विहिरीच्या वरील १ मोटार जप्त केली आहे. याशिवाय, चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक होंडा कंपनीची पॅशन मोटारसायकल असा एकूण ६,४३,००० रुपयांचा जुना-वापरता माल जप्त करून पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे.



तपास पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर साहेब (प्रभारी ठाणेदार), सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) रासकर साहेब, पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) जगताप साहेबबाबर्डे साहेब यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार:



  • संजय लाडे

  • स्वप्नील मोरे

  • धीरज मिसाळ

  • प्रदिप कुचनकर

  • चापोहवा विलास लोहकरे

  • अजय वानखेडे

यांच्यासह सायबर सेलचे अक्षय राउत आणि गोविंद मुंडे यांनी ही कामगिरी बजावली.

 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!