
ट्रक चालकाचे अपहरण करुन त्यातील तांदुळ चोरी प्रकरणाचा युनीट १ ने काही तासात केला उलगडा….
ट्रकचालकास जबरीने मारहाण व अपहरण करुन २७ टन तांदूळ लूटणा-या टोळीतील आरोपींना अवघ्या ६ तासांत २९,००,०००/-रु. किंमतीच्या मुददेमालासह घेतले ताब्यात,गुन्हे शाखा युनीट १ ची कामगिरी…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२२) जुन २०२५ रोजी तक्रारदार निझामुद्दीन मोहम्मद सईद, वय ५४ वर्षे, रा.रेल्वे दवाखान्याचे मागे, नविन पोटर चाळ, ता.जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन नांदगाव पेठ येथे तक्रार दिली की ते दृक क्रमांक MH 20 EG-2639 यावर चालक असून त्यांनी ट्रकमध्ये २७ टन तांदूळ भरुन गोंदिया येथे जात असतांना ४ अनोळखी ईसमांनी एका चारचाकी वाहनाने सेलिब्रेशन हॉल, रिंगरोड येथे त्यांचा ट्क थांबवून त्यास ट्रकचे खाली उतरवून मारहाण करुन त्यांचे डोळयाला पट्टी बांधून त्याला दूस-या चारचाकी वाहनात जबरीने बसविले. व ४ तास फिरविले व ट्रक मधील २७ टन तांदूळ किंमत ७,००,०००/-रु. चा माल अज्ञात आरोपींनी दूस-या ट्रकमध्ये भरुन फिर्यादी व त्याच्या ट्रकला निर्जनस्थळी सोडून तांदूळाने भरलेल्या ट्रकसह पळून गेले. अशा ट्रकचा चालक याचे तक्रारीवरुन वरुन पो.स्टे. नांदगांवपेठ येथे अप क्र २१५/२०२५ कलम ३०९ (६), १४० (३), ३५१ (३), ३(५) बि.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता



सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व हायवे रोड रॉबरी सारखा धाडसपुर्ण असल्याने अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करुन आदेशीत केले होते.त्यानुसार गुन्हे शाखा, युनिट १, चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून फिर्यादी ट्रक चालक याचेकडे बारकाईने चौकशी करुन येणा-या मार्गावरील सि.सि.टी.व्ही. फुटेज व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली असता अशी माहिती प्राप्त झाली की, काही ईसम यांनी लालखडी भागात तांदूळाने भरलेला ट्रक आणला होता. सदर माहिती खात्रीशीर असल्याने मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी क्र १) अजमत खान करामत खान, वय ३६ वर्षे, रा. रहेमत नगर, अमरावती आरोपी क्र २) शेख ईम्रान शेख रहेमान, वय ३४ वर्षे, रा. हबीब नगर, नं. १, अमरावती यांना शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे ईतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.

वर नमुद आरोपी यांचे ताब्यातुन १.) टाटा कंपनीचा १६ चक्का ट्रक क.MH 41 AU-9333 किंमत २२,००,०००/-रु. २) २७ टन तांदूळ किंमत ७,००,०००/-रु. असा एकूण २९,००,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकार,पोलिस उपआयुक्त (परि. १)सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) शिवाजी बचाटे,सहायक पोलिस आयुक्त (फ्रेजरपुरा विभाग)कैलाश फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा फिरोज खान,सतीष देशमूख, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर,पोशि रणजीत गावंडे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक- अशोक खंगार, किशोर खेंगरे, सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट ०१ यांनी यांनी केलेली आहे.



