वरोऱ्यात धारदार तलवारीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वरोरा (चंद्रपूर): वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या आणि विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर (विधिसंघर्षग्रस्त बालक) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तलवार जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा उपविभागीय पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वरोरा येथील हुडकी (चिनोरा) परिसरात एक जण विनापरवाना घातक शस्त्र बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पथकाने ७ जुलै २०२६ रोजी हुडकी येथे सापळा रचून छापा टाकला.



या छाप्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीररित्या बाळगलेली ७०० रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार मिळून आली. पोलिसांनी ती तलवार जागीच जप्त केली आहे.

गुन्हा दाखल: याप्रकरणी संबंधित १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ७९३/२६, कलम ४ आणि २५ भारतीय शस्त्र अधिनियम  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



कारवाई करणारे पथक: सदर धडक कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग वरोरा पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!