
शासकीय अधिकारी यांचे कडील घरफोडीचा तसेच वाहनातुन चोरलेल्या शस्त्राचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा…
उपविभागिय अधिकारी याचे येथील घरफोडीचा तसेच त्यांचे वाहनातुन चोरलेल्या रिव्हॅाल्व्हरचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा,आरोपी अटकेत….
मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्री. प्रदीपकुमार पवार, उप-विभागीय अधिकारी (महसुल), मोर्शी यांनी पो.स्टे. मोर्शी येथे तक्रार दिली की, दि. 08/08/2025 रोजी त्यांचे शासकीय निवासस्थान येथे उभी असलेली त्यांचे चारचाकी हुंडाई क्रेटा या वाहनातुन दुपारी 02.00 वा. दरम्यान वाहनाचे काच फोडुन डॅशबोर्डचे डिक्कीतुन अज्ञात आरोपीने त्यांची सर्व्हिस रिव्हाल्वर किं.90,000/- रू तसेच घराचे कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून कपाटातील कागदी रिम चोरून नेले आहे. अशा प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पो.स्टे. मोर्शी येथे कलम 305(बी), 331(1),324 (2) भा. न्या. सं.प्रमाणे नोंद करण्यात आला आहे



सदर गुन्हयांचे गांभीर्य पाहता पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन तात्काळ चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले त्यानुसार पो.स्टे. मोर्शी येथील पथकाने दिवस-रात्र अथक परिश्रम घेत परिसरातील सि.सि.टी.व्ही. फुटेज तसेच तांत्रीक मदत घेऊन त्याचे सहाय्याने 12 तासांचे आत आरोपी अजय ऊर्फ राजेश गोवर्धन दांडगे, वय 36, रा. तळणी पुर्णा, ता. चां. बाजार यास निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता प्रथमं त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली, त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयात चोरलेली फिर्यादी यांची सर्व्हिस रिवाल्वर जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उप-विभागीय पोलिस अधिकारी, मोर्शी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन. मोर्शी चे नुतन ठाणेदार पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे नेतुत्वात स.पो.नि.आर.टी. नांदगांवकर, लक्ष्मण चिंचोले, पो.उप.नि. आकाश शिवणकर, पोलीस अमंलदार गजानन सुंदरकर, योगेश सांभारे, मनोज गायकी, संदीप वंजारी, स्वप्नील बायस्कर, अर्थव कोहळे व अं. हबीब यांचे पथकाने केली आहे.




