
शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा हिंगणघाट पोलिसांनी काही तासात लावला छडा,आरोपींना घेतले ताब्यात…
पैश्याच्या देवानघेवानीतुन झालेल्या शुल्लक वादातुन खुन करुन पळुन गेलेल्या ३ आरोपीच्या हिंगणघाट डीबी पथकाने काही तासाचे आत आवळल्या मुसक्या
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सौ ज्योती मनोज बेदी वय 32 वर्ष रानिशानपुरा वार्ड हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की,त्यांचे पती मनोज बेदी यांनी यातील आरोपी क्र १ बंटी जयराज कडुन व्याजाने पैसे घेतले होते. त्या व्याजाच्या पैशाचे कारणावरून आरोपी बंटी जयराज हा नेहमी फिर्यादीच्या घरी जावुन पैसे मागण्याचा तगादा लावत होता. व त्या कारणावरून फिर्यादीचे पती मनोज यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता.



याच कारणावरून दिनांक 22/08/02025 चे रात्री 08/30 वा चे दरम्यान यातील आरोपी क्र २ रूपेश मंडलवार व आरोपी क्र ३ अमजत पठान हे फिर्यादी सौ ज्योती मनोज बेदी यांचे घरी आले व फिर्यादीचे पती मनोज यास घरून सोबत घेवुन गेले. पती रात्रभर घरी न आल्याने ज्योती ही पोलीस स्टेशनला गेली असता तिला माहीती मिळाल्या वरून तिने दाभा रोडवरील नाल्यात जावुन पाहीले असता फिर्यादीला नाल्याचे पाण्यामधे तिचे पती मनोज बेदी यांचे प्रेत तरंगताना दिसले

यावरुन यातील तिन्ही आरोपींनी पैशाच्या वादावरून संगनमत करून फिर्यादीचे पती मनोज बेदी यास जिवाने ठार मारून दाभा गावाजवळील नाल्यातील पाण्यात टाकले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपीतां विरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधीकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांच्या मागदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांचे नेत्रुत्वात आरोपीचा शोध घेणेकामी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि. बी. पथकास योग्या त्या सुचना देऊन रवाना केले सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपी घटनेनंतर फरार झाले होते त्या करीत सायबर सेल च्या मदतीने तांत्रीक शोध घेऊन सदरचे आरोपी हे अमरावती येथे असल्याचे कळले
लगेच डी बी पथक यांचे अमरावती येथे रवाना झाले व मिळालेल्या तांत्रीक माहीतीच्या आधारे कसुन शोध घेतला असता बडनेरा येथून आरोपी क्र २ रूपेश मंडलवार व आरोपी क्र ३) अमजद पठान दोन्ही रा. हिंगणघाट यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे आरोपी क्र १) बंटी जयराज यास हिंगणघाट येथील त्याचे घरून ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपीं कडुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधीकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांच्या मागदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांचे सुचनेनुसार डीबी पथकाचे पोहवा प्रशांत ठोंबरे, नापोशि राजेश शेंडे, पो.शि आशिष नेवारे , मंगेश वाघमारे, रोहीत साठे हे त्याचे पथका सह सायबर शाखा वर्धा येथील पोहवा अनुप कावळे, गोविंद मुंडे यांनी केली असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोउपनि महेश इटकल करीत आहे.



