
गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापणारी टोळीच्या सदस्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,घुग्गुस येथील गुन्हा केला उघड…
पोलिस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपीस राजस्थान येथुन घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ५/०९/२०२५ रोजी रात्रीचे दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र,
पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसमांनी गॅस कटरचे सहाय्याने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रू चोरी करुन नेले अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन, घुग्घुस जि. चंद्रपुर येथे १८४ / २०२५ कलम ३०५, ३३१(४), ३३४ (१) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला होता
नमुद गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे,यांना वेगवेगळे पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपी शोध घेण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील
वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी केली असती घटने दरम्यान एक पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो विना क्रमांकाच्या वाहनात काही अज्ञात इसम येवुन ऑक्सीजन गॅस कटरचे साहाय्याने बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM मशिनची
कटींग करून पैसे चोरी करून घेवुन गेल्याचे दिसुन आले. त्यावरून सदर पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो विना क्रमांकाचे वाहनाचे पाठलाग करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील दोन वेगवेगळे पथक करून एक पथक देशाचे उत्तर दिशेला व दुसरे पथक दक्षिण दिशेला रवाना करून, सतत १३ दिवस, दिवस-रात्र अंदाजे ९००-१००० सी.सी.टि.व्हि. कॅमे-याची पाहणी करून तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून अथक परिश्रम घेवुन आरोपी जिल्ली सिरदार खान, वय ५२ वर्ष, रा. सबलगड ता. कामा, जि. भरतपुर, राज्य राजस्थान यास चिन्नुर, जि. मंचेरियाल, राज्य- तेलंगाना येथुन ताब्यात घेण्यात आले.



सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, घुग्घुस, जि. चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी १) साजीद खान राजुददीन, रा. भाकडोजी, पोलीस स्टेशन फिरोजपुर झिरका, जिल्हा नुह राज्य हरीयाना,
२) शैकुल उन्नस खान, रा. सायलेर, पोलीस स्टेशन पहाडी, ता. पहाडी, जिल्हा, डिग, राज्य राजस्थान, ३) काला, रा. गुमटकी, बडकली चौकी, पोलिस स्टेशन नगीना, जिल्हा नुह, राज्य हरीयाणा यांचा शोंध सुरु आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार,सतिश अवथरे,
रजनिकांत पुट्ठावार,दिपक डोंगरे, इम्रान खान,पोशि किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता,शशांक बादामवार, मिलींद जांभुळे,चापोशि रूषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच सायबर पोलिस ठाणे, चंद्रपुर यांनी केली आहे.




