
अकोला: उर्दू हायस्कूलसमोर तरुणाची चाकू-तलवारीने निर्घृण हत्या; ३ आरोपींना तासाभरात पोलिसांकडून ठोकल्या बेड्या!
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २२.३० वा. च्या सुमारास उर्दू हायस्कूल मैदानावर नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव (वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर, नवीन बस स्टँड मागे, अकोला) हे आपल्या मित्रमंडळींसह बसलेले होते. जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी आपसात संगनमत करून धारदार चाकू व तलवारीने वार करून नितेश यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी फिर्यादी सौ. मंजु निलेश जाधव यांच्या तक्रारीवरून पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप. क्र. ६०५/२०२६ कलम १०३ (१), ३(५), ३५२ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्यात आलेले ३ आरोपी:-

१. रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर
२. अंश प्रदिप सिरसात

३. ऋषभ उर्फ सागर विजय कृष्णपल्लोवार
तपास आणि कारवाई करणारी पोलीस टीम

मार्गदर्शक व वरिष्ठ अधिकारी:
-
अर्चित चांडक साहेब – मा. पोलीस अधीक्षक, अकोला

-
रेड्डी साहेब – मा. अपर पोलीस अधीक्षक, अकोला
-
सुदर्शन पाटील साहेब – मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला
प्रत्यक्ष कारवाई व तपासातील पोलीस टीम:
-
पो.नि. श्रीमती मालती कायटे (पो.स्टे. सिव्हील लाईन, अकोला – विशेष शोध पथक प्रमुख)
-
स.पो.नि. महेंद्र शिंदे
-
PSI दिनेश पवार
-
पो.कॉ. श्रीकांत आजलसांडे (अंमलदार पो. हे. कॉ.)
-
पो.कॉ. शक्ती कांबळे
-
पो.कॉ. पवन सिरसात
-
पो.कॉ. एकनाथ त्रिकाळ
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार पो.नि. मालती कायटे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या एका तासाच्या आत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीनही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.




