वर्धा: ‘ऑल आउट’ मोहिमेत कारवाई; गांजा पिणाऱ्या तिघांना रंगेहात अटक!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्ध्यात ‘ऑल आउट’ मोहिमेत मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी गांजा पिणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात!

वर्धा:

अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह आणि ‘ऑल आउट मोहिमे’ अंतर्गत वर्धा जिल्हा पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान रामनगर पोलीस स्टेशनच्या दारूबंदी पथकाने रविवारी (दि. २८ जून) दुपारी गौरक्षण वार्ड येथील रेल्वे क्वार्टर सार्वजनिक वाचनालयाजवळ छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तीन तरुणांना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात खाली करण्यात आली आहे.



गुप्ता बातमीदाराच्या माहितीवरून छापा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक ‘ऑल आउट मोहिमे’ अंतर्गत पेट्रोलिंगवर होते. यादरम्यान पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, गौरक्षण वार्ड येथील रेल्वे क्वार्टर सार्वजनिक वाचनालयाच्या आडोशाला काही तरुण गांजा ओढत बसले आहेत. माहिती मिळताच दारूबंदी पथकाने दुपारी ०१:१५ ते ०२:१५ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा (रेड) टाकला.

हे आहेत अटक केलेले आरोपी:

सार्वजनिक ठिकाणी गांजा पिताना पोलिसांनी खालील तिघांना रंगेहात पकडले:



  • राजेश नंदकिशोर बडसर (वय ३४ वर्ष, रा. सानेवाडी, वर्धा)

  • कार्तिक दीपक सगळे (वय २७ वर्ष, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा)



  • किसना अमर पसेरकर (वय २० वर्ष, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा)

मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:



  • एका प्लास्टिकच्या छोट्या पाऊचमध्ये गांजा सदृश वनस्पती (किंमत २०० रुपये)

  • गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चिलम/पुंगळी (किंमत १५० रुपये)

  • गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी कापडी चिंधी (छापा) आणि चाबी छाप माचिस डब्बी (किंमत ५ रुपये)

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ५९८/२०२६, कलम ८ (क), २७ एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस पथक: रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम यांच्या निर्देशानुसार पोलीस अंमलदार अवि बनसोड, मनोज भोमले, मुकेश वांदिले, विकी अणेराव आणि महिला पोलीस अंमलदार कांचन कौरती यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!