नवीन कामठी पोलीस: १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस, आरोपीसह संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नवीन कामठी पोलिसांची मोठी कामगिरी: घरफोडीचा गुन्हा १२ तासांच्या आत उघडकीस, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत आणि आरोपीला अटक

दिनांक: ९ ऑगस्ट २०२६ (रविवार)



नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला घरफोडीचा गुन्हा केवळ १२ तासांच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील:



  • घटना घडण्याची वेळ: ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० ते रात्री २०:३० वाजेच्या दरम्यान.

  • घटनेचे ठिकाण: जयभीम चौक, रमेश कबाडीच्या घराजवळ, कामठी.



  • फिर्यादी: सुरेश परमानंद लोणारे (वय ५६ वर्षे, रा. कामठी).

  • घटनेचा क्रम: फिर्यादी सुरेश लोणारे हे कुटुंबासह कामठी बाजारात धान्य विक्रीचे दुकान लावण्यासाठी गेले असता, त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावले होते. या दरम्यान अज्ञात चोराने घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी अलमारीतून रोख रुपये आणि सोन्याचे विविध दागिने असा एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.



  • गुन्हा दाखल: फिर्यादीच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस तपास व कारवाई: तपासादरम्यान नवीन कामठी पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास केला. मिळालेल्या वर्णनानुसार आरोपीबद्दल खात्रीशीर माहिती मिळवून आरोपी निष्पन्न केला.

  • अटक करण्यात आलेला आरोपी: रोहीत नरेशेडाम (वय ४३ वर्षे, रा. भिमनगर, जयभीम चौक, कामठी, नागपूर).

आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदर घरफोडीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन व तपास पथक: ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) श्रीमती विनीता शाहू, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ क्र. ६)  संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त (कामठी विभाग) अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच वपोनि.  महेश आंधळे, पोउपनि. योगेश नालटे, अक्षय झगडे, पोहवा. दीपककुमार चोले, पोअं. नितेश नवघडे, नसीम अंसारी, विलास चिंचुलकर आणि आकाश टेकाम यांनी ही कामगिरी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!