नागपुरातून कुख्यात तडीपार आरोपी करण शिंदे पांढरकवडा पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पांढरकवडा (यवतमाळ) येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. खून, मारामारी, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि खुनाचा प्रयत्न करून फरार झालेला कुख्यात तडीपार आरोपी करण संजय शिंदे (वय ३२ वर्ष, रा. ताडउमरी, ता. केळापूर) याला पांढरकवडा पोलिसांनी नागपूर येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे.

१. घटना आणि दाखल गुन्हा: दिनांक ९ जून २०२६ रोजी फिर्यादी आकीब बेग अफाज बेग मिर्झा (वय २८ वर्ष, रा. मोमीनाबाद कॉलणी, पांढरकवडा) यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा (अप.क्र. ७८७/२६) नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९, १८९(२)(४), १९०, १९१(१)(३) तसेच ७ फौ.का.सु. अधि. आणि ४, २५ शस्त्र अधिनियमान्वये दाखल करण्यात आला होता.सदरची यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, आणि पांढरकवडाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



२. या प्रकरणातील एकूण आरोपी: या गुन्ह्यामध्ये एकूण ७ आरोपींचा समावेश आहे:

१) करण संजय शिंदे (वय ३२ वर्ष, रा. ताडउमरी)



२) सुजित मोक्षविर वानखेडे (वय २७ वर्ष, रा. लटारे ले आउट, पांढरकवडा)

३) शेख समीर शेख चाँद (वय २५ वर्ष, रा. पाण्याचा टाकीजवळ, आखाडा वार्ड, पांढरकवडा)



४) पार्थ पंकज शेटे (वय २१ वर्ष, रा. आखाडा वार्ड, पांढरकवडा)

५) आशिष माणीक बेहेरे (वय २१ वर्ष, रा. पोसवाल ले आउट, पांढरकवडा)



६) साईराम सुखदेव आगरकर (वय १९ वर्ष, रा. वैभव नगरी, पांढरकवडा)

७) कौस्तुभ कृष्णराज कोवे (वय १७ वर्ष, रा. डी.पी. रोड, पांढरकवडा)

३. नागपूर येथून मुख्य आरोपी गजाआड: घटनेच्या दिवशीच पोलिसांनी आरोपी क्रमांक २ ते ७ यांना तातडीने अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी करण संजय शिंदे हा घटनेपासून फरार झाला होता. पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. (गुन्हे शोध) पथकाने अत्यंत गोपनीय आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. आरोपीचा कसोशीने शोध घेत अखेर त्याला नागपूर शहरातून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी पांढरकवडा येथे आणले गेले आहे.

४. कामगिरी करणारे पोलीस पथक:

या कारवाईत पांढरकवडाचे ठाणेदार पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हेकॉ. प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनील राठोड, सचिन काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार यांनी मोलाची भूमिका बजावली.

या कुख्यात आणि तडीपार आरोपीच्या अटकेमुळे पांढरकवडा परिसरात पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!