
मुख्य बातमी: खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना राजापेठ पोलिसांकडून अटक
अमरावती (दि. १० जुलै २०२६): अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानखेडा बु. येथील एका गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. २ जुलै २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश मुंढे करत आहेत. सदर धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब, पोलीस उपायुक्त श्याम घुगे साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तांत्रिक पुरावे नसतानाही पोलिसांचा यशस्वी शोध: या गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश केशव स्वर्गे (वय ३६ वर्षे, रा. भानखेडा बु.) हा गुन्ह्याच्या दिवसापासून (२ जुलै २०२६) फरार होता. त्याच्याकडे कोणताही तांत्रिक पुरावा (उदा. मोबाईल लोकेशन इत्यादी) उपलब्ध नसताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी फक्त गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली होती. त्यापैकी २ पथके बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे २ दिवस तळ ठोकून होती, तर २ पथके कारंजा येथे शोध घेत होती. अमरावती शहरातील अनेक भागातही शोधमोहीम राबवण्यात आली.
परतवाडा येथून मुख्य आरोपी जेरबंद: दिनांक ९ जुलै २०२६ रोजी मुख्य आरोपी योगेश स्वर्गे हा परतवाडा येथील गुलाबाबा मिश्रा चौकात असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) नितीन शिंदे व डी.बी. पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला तिथून ताब्यात घेतले.

मदत करणाऱ्या नातेवाईकांनाही अटक: योगेश स्वर्गे याने गुन्हा केला आहे हे माहिती असूनही त्याला लपण्यास आणि पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या दोन नातेवाईकांनाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. दिपक मोतीराम स्वर्गे (वय ४८ वर्षे, रा. भानखेडा बु., जि. अमरावती)

२. देवाशिष विलास इंगोले (वय १८ वर्षे, रा. गुलाबाबा परतवाडा, जि. अमरावती)
तपास अधिकारी आणि पोलीस टीम: या कारवाईत राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक उमेश मुंढे सपोनि नितीन शिंदे, तसेच पोलीस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवि लिखीतकर, शशीकांत शेळके, अंकुश काळे, अमोल खंडेझोड, प्रशांत बेलोरकर, रफीक खान, आकाश यादव, नरेश बावणे, अर्जुन कदम, अमोल देशमुख आणि पंकज गाठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





