इन्स्टाग्रामवर चाकूचे फोटो व्हायरल करून दहशत पसरवणारे दोघे अटकेत; अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर हातामध्ये चाकू सारखे प्राणघातक शस्त्र घेऊन फोटो व्हायरल करणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या दोन तरुणांना अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अमरावती शहर पोलीस सतर्कतेने काम करत आहेत. दरम्यान, राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना माहिती मिळाली की, सोशल मीडियावर दोन तरुण चाकू हातामध्ये घेऊन फोटो व्हायरल करत आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी राजापेठ डी.बी. पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डी.बी. प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) नितीन शिंदे आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना माहिती मिळाली की सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणारे हे दोन तरुण कोल्हटकर कॉलनी परिसरातून जात आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून कोल्हटकर कॉलनीतील हिंदू स्मशानभूमीच्या भिंतीजवळून या दोघांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले. ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 अटक करण्यात आलेले आरोपी:



१) रितीक राजू डोंगरे (वय २१ वर्ष, रा. गांधी आश्रम, गल्ली नं. २, अमरावती)

२) पवन गोपाल कांबळे (वय १८ वर्ष, रा. हनुमान मंदिराजवळ, महाजनपुरा, अमरावती)



घातक शस्त्रे जप्त: पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, दोघांकडून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २ चायना चाकू जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक चाकूची एकूण लांबी ११ इंच (पात्याची लांबी ६ इंच, मूठ ५ इंच आणि पात्याची रुंदी ३ इंच) असून त्यांची एकूण किंमत १,००० रुपये आहे.

हे आरोपी धारदार शस्त्र बाळगून सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करत होते. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८३/२०२६ नुसार कलम ४/२५ आर्म्स ॲक्ट (भारतीय हत्यार कायदा) सह कलम १३५ मपोका (महाराष्ट्र पोलीस कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



यांनी केली कारवाई: कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सपोनी नितीन शिंदे, पोलीस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवी लिखितकर, शशी शेळके, अंकुश काळे, मंगेश कपिले, नरेश बावने, प्रशांत बेलोरकर, अर्जुन कदम, अमोल खंडेजोड, आकाश यादव, रफीक खान आणि यश ओगले यांचा सहभाग होता. 









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!