
अंजनगाव सुर्जी पोलीस ॲक्शन मोडवर: ३ बकऱ्या चोरणाऱ्या आरोपींना ऑटो आणि रोकडसह आवळल्या मुसक्या!
अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडाकेबाज कारवाई: बकरी चोरी करणाऱ्या आरोपींना काही तासांतच अटक, दोन गुन्हे उघडकीस!
अंजनगाव सुर्जी (अमरावती):
पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी हद्दीतील बकऱ्या चोरी करणाऱ्या आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दिनांक २२/०७/२०२६ रोजी फिर्यादी मुशाहीद खा मुस्तफा खा (वय २९ वर्षे, रा. नवगज्जी प्लॉट, अंजनगाव सुर्जी) यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे जबानी रिपोर्ट दिली. दिनांक २०/०७/२०२६ रोजी त्यांच्या मालकीच्या ३ बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या असता त्या घरी परत आल्या नाहीत. फिर्यादीने आजूबाजूला शोध घेतला असता बकऱ्या मिळून आल्या नाहीत.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने अंदाजे ३७,०००/- रुपये किमतीच्या ३ बकऱ्या चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरून अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३७०/२०२६, कलम ३०३ (२) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची कारवाई व आरोपींना अटक
जनावर चोरीचे गुन्हे वाढल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणेदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे तपास चक्र फिरवले.
या तपासात अचलपूर येथील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:

-
शेख इरशाद शेख याकुब (वय ४० वर्षे, रा. देवडी महल, अचलपूर)
-
सचिन नरेश माकोडे (वय २६ वर्षे, रा. हिरापुरा, अचलपूर)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
आरोपींकडे कसून विचारपूस केली असता, त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
-
नगद रक्कम: ₹१५,०००/- (चोरीच्या बकरीच्या विक्रीतून मिळालेले)
-
मोबाईल फोन: २ मोबाईल (किंमत ₹२,२००/-)
-
वाहन: बकरी चोरीसाठी वापरलेला ऑटो (किंमत ₹९०,०००/-)
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,०७,२००/-
दुसरा गुन्हा उघडकीस
अटक केलेल्या आरोपींकडे इतर बकरी चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ५२४/२०२५, कलम ३०३(२) बीएनएस मधील गुन्ह्याची देखील कबुली दिली. पोलिसांनी सदर गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करून बकरी चोरीचे एकूण २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस पथक व मार्गदर्शन
सदरची कामगिरी खालील पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात पार पडली:
-
मार्गदर्शन:
-
पोलीस अधीक्षक निकेतन कदम सर
-
अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड सर
-
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल हुड सर
-
-
कारवाई करणारे पथक:
-
सुरज बोंडे (ठाणेदार, पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी)
-
भारत चिरडे (पोउपनि)
-
जयसिंग चव्हाण (पोहेकॉ)
-
रवि राठोड (पोकॉ)
-
अमित घाटे (पोकॉ)
-
आकाश रंगारी (पोकॉ)
-
मोहसिन पठाण (पोकॉ
-




