
अमरावतीत कत्तलीसाठी नेणारा ५ लाखांचा गोवंश जप्त; दोघांना अटक
अमरावती (चांदूर बाजार):
अमरावती ग्रामीण पोलीस ठाणे ब्राह्मणवाडा थडी च्या हद्दीत चोरलेल्या गोवंशाची अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल (वाहनासह) जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

-
अब्दुल मुजम्मिल अब्दुल रऊफ (वय ३१ वर्षे, रा. घाटलाडकी)
सद्दाम खान नियाज खान (वय ३० वर्षे, रा. ब्राह्मणवाडा थडी)

-
गुप्त माहिती: २४ जुलै २०२६ रोजी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एका चारचाकी वाहनातून २ गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने ग्राम मार्कंडा येथून ब्राह्मणवाडा थडीच्या दिशेने आणली जात आहेत.
सापळा आणि कारवाई: माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मार्कंडा ते ब्राह्मणवाडा थडी रस्त्यावरील पुलावर सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली.

निर्दयतेने वाहतूक: तपासणीदरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात २ गोवंश अत्यंत अमानुषपणे, आकुड (लहान) दोरीने बांधून आणि वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले.
-
वाहन: पांढऱ्या रंगाचे TATA INTRA पिकअप चारचाकी वाहन (क्रमांक: MH 30 DE 6155) – किंमत सुमारे ₹४,५०,०००/-

गोवंश: २ चोरलेले गोवंश – किंमत सुमारे ₹६५,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹५,१५,०००/-
दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ३१७/२०२६ अन्वये खालील कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३०३(२) (चोरी)
महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६: कलम ५(अ), ५(ब)
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०: कलम ११(१)(ड), (फ)
मोटार वाहन कायदा: कलम १८४
सदर यशस्वी कारवाई निकेतन कदम (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) यांच्या आदेशाने आणि दत्ता तोटेवाड (अपर पोलीस अधीक्षक),माधवराव गरूड (उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी), तसेच पो.नि. अशोक लांडे (स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-
सहा. पो. नि. प्रशांत जाधव (ठाणेदार, पो.स्टे. ब्राह्मणवाडा थडी)
सपोउपनि राजेंद्र पवार
पोहेकॉ राजू मरस्कोल्हे
पोशि अनुप मानकर
पोशि अंकुश दाभाडे
चालक मपोशि वैष्णवी खेतकर




