
गुन्हेशाखा युनिट पथकाची कारवाई वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस
-
घटनेची पार्श्वभूमी: दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २१:०० ते २१:३० वाजेच्या दरम्यान, फिर्यादी अभिषेक विनायक गेडेकर (वय २३ वर्षे, रा. प्लॉट क्र. ४४, भरतवाडा, कळमणा, नागपूर) यांनी आपली ‘हिरो होंडा स्लेंडर’ मोटारसायकल (क्र. MH 49 BY 2438) ही लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौक, मोबाईल एक्सप्रेस दुकानासमोर लॉक करून पार्क केली होती. दुकानात गेले असताना अज्ञात चोरट्याने ती पळवून नेली. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
तपास व कारवाई: गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हेशाखा युनिट क्र. ०३ च्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी राहुल शंकरराव सातपुते (वय ३९ वर्षे, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक, लकडगंज, नागपूर) याला ताब्यात घेतले.

-
मुद्देमाल जप्ती: सखोल चौकशीदरम्यान आरोपीने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ₹८०,०००/- (अंशी हजार रुपये) किमतीची चोरी केलेली हिरो होंडा स्लेंडर मोटारसायकल जप्त करून आरोपीला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
-
मार्गदर्शन व पथक: ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर राजेंद्र दाभाडे, मा. पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, मा. सह. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अतुल मोहनकर व त्यांच्या पथकाने केली.







