अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार मुख्य आरोपींना गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

अमरावती: वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील पाच मुख्य आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भातकुली बस स्टँडवरून शिताफीने ताब्यात घेतले आहे.



समता नगर, वलगाव येथील रहिवासी लिलाबाई अनिल तसरे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:०० वाजता गोलू उगले, मिलिंद तायडे, सुमित सुरजुसे आणि अजय नागदिवे हे त्यांच्या घरी आले. त्यांनी लिलाबाई यांचा नातू संजोग विकास जोशी (वय १९) आणि त्याचा मित्र ऋतिक पंडित यांना सोबत नेले.

त्यानंतर रात्री ११:३० वाजताच्या सुमारास संजोग आणि ऋतिक यांच्यावर चाकुने हल्ला झाल्याची माहिती लिलाबाईंना मिळाली. दोघांना उपचारासाठी ईर्विन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



घटनेच्या वेळी जुन्या बस स्टॉपजवळ असलेल्या साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी संजोग आणि ऋतिक यांच्यावर चाकूने प्राणघातक वार केले. या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ४९, ३(५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेची कारवाई व आरोपींना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली.



गोपनीय माहितीच्या आधारे, हे आरोपी भातकुली बस स्टँडवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ५ आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे:



१) विक्की उर्फ गोलू विकास उगले (वय २१ वर्ष, रा. वलगाव)

२) मिलन गोपालराव तायडे (वय २१ वर्ष, रा. वलगाव)

३) अजय दिलीपराव नागदिवे (वय २१ वर्ष, रा. वलगाव)

४) अनिकेत विलास मेश्राम (वय २५ वर्ष, रा. वलगाव)

५) सुमित सुधाकर सुरजुसे (वय १९ वर्ष, रा. वलगाव)

पाचही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, तसेच सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर व निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १, युनिट २ आणि वलगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!