हिंगणघाट एम.डी. विक्री प्रकरण: मकोकाअंतर्गत फरार आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर वर्धा पोलिसांनी ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी पंकज प्रभाकर साठवणे याला छत्रपती संभाजीनगर येथून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन १७ जून २०२६ रोजी अटक केली आहे. ३१ मे २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला कारवाई करत ५४ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) जप्त केले आणि ५ आरोपींना अटक केली होती.

 १. पियुष ऊर्फ मस्तान राजू मुसळे (वय २७, रा. हिंगणघाट)



२. निखिल मनोजराव रामनवार (वय २५, रा. हिंगणघाट)

३. जय वसंतराव चुटे (वय २१, मूळ रा. हिंगणघाट, सध्या रा. जयताळा, नागपूर)



४. कार्तिक वसंतराव हमंद (वय २९, मूळ रा. हिंगणघाट, सध्या रा. त्रिमूर्ती नगर, नागपूर)

५. रितीक ऊर्फ पकोडा प्रकाशराव खोडे (वय २६, रा. हिंगणघाट)



तपासादरम्यान संघटित गुन्हेगारी समोर आल्याने १३ जून २०२६ रोजी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मकोका) च्या कलमांची वाढ करण्यात आली.

फरार आरोपीचा तांत्रिक तपासाद्वारे शोध

या गुन्ह्यातील आरोपी पंकज प्रभाकर साठवणे (रा. सोमवारी क्वार्टर, सक्करदरा, नागपूर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.



  • पंकज साठवणे याच्यावर नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिसांत चोरी, घरफोडी, शस्त्र कायदा, अंमली पदार्थ विक्री (गांजा/एम.डी.), जुगार आणि दारूबंदी असे एकूण २८ गुन्हे दाखल आहेत.

  • तो नागपूर शहर व ग्रामीणमधील अजनी, बेलतरोडी आणि बुटीबोरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्येही फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.

तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे वर्धा पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन १७ जून २०२६ रोजी औपचारिक अटक केली.

तपास पथक

ही यशस्वी कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोहवा उमाकांत लडके, रवींद्र घाटुर्ले, चेतन पिसे, सतीश घवघवे, भारत बुटलेकर, अनंत हराळ, दीपक मस्के तसेच पोहवा नरेंद्र डहाके आणि नरेंद्र आरेकर यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक करत आहेत.

वर्धा पोलिसांचे नागरिकांना आवाहन

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आरोपींनी अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या पैशांचे व्यवहार (मनी ट्रान्सफर) करण्यासाठी इतर व्यक्तींच्या ए.टी.एम. कार्ड, बँक खाते क्रमांक आणि UPI क्यूआर कोड/स्कॅनरचा वापर केला होता. त्यामुळे वर्धा पोलीस दलाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे:

“आपले बँक खाते, ए.टी.एम. कार्ड अथवा UPI स्कॅनर कोणत्याही अनोळखी किंवा इतर व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. त्याचा गैरवापर करून तुम्हाला गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते.”







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!