
सायबर फसवणूक: अमरावतीत म्युल अकाउंट पुरवणारी ६ जणांची टोळी जेरबंद
सायबर फसवणुकीतील ‘म्युल अकाउंट’ पुरवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; अमरावती सायबर पोलिसांकडून ६ जणांना अटक
अमरावती:
सायबर फसवणुकीतून मिळालेली अवैध रक्कम जमा करण्यासाठी आणि पुढे हस्तांतरित करण्यासाठी बँक खाती (म्युल अकाउंट्स) उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आणखी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपासातील महत्त्वाची माहिती व कारवाई
-
७१ लाखांचे संशयास्पद व्यवहार:
अमरावती सायबर पोलिस स्टेशनने ‘म्युल अकाउंट हॉटस्पॉट’ (Mule Account Hotspot) चे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात सायबर फसवणूक, ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) व्यवहारांसाठी म्युल अकाउंट्सचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांद्वारे सुमारे ₹७१,००,०००/- (एकाहत्तर लाख रुपये) चा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

-
-
करण दिनेश तानोलकर (रा. म्हाडा कॉलनी, न्युटाऊन बडनेरा)
-
रोहन प्रभाकर वैद्य (रा. पवन नगर, नवी वस्ती, बडनेरा)

-
सौरभ नितीन नेपाळे (रा. कालीमाता मंदिराजवळ, नाथवाडी, अमरावती)
-
अजिंक्य गजानन गिरी (रा. न्यु कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती)

-
विजय महेशलाल झामनानी (रा. रामपुरी कॅम्प, गल्ली क्र. २, अमरावती)
-
मयुर हरिश मोटवानी (रा. कृष्णा नगर, गल्ली क्र. १, अमरावती)
जप्त केलेला मुद्देमाल:
आरोपींकडून ६ मोबाईल हँडसेट, ६ सिमकार्ड्स, विविध बँकांचे पासबुक, एटीएम कार्ड्स आणि बँक खात्यांचा तपशील जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
-
मार्गदर्शन व तपास पथक
ही उल्लेखनीय कारवाई अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला व पोलिस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या नेतृत्वात सपोनि अनिकेत कासार, पो.हे.कॉ. जितेंद्र थोरात, निखिल माहुरे, उल्हास टवलारे, नरेंद्र उघडे, महेश वाघमारे, विशाल यादव, ममता अब्रुक, अपर्णा बंडे, पो.कॉ. निखिल हिमाने, अश्विन यादव, रोशन लकडे, करण बोरकुटे, निलेश वानखडे, बाळू पालवे, अनिकेत वानखडे, पवन जाधव, चेतन गुन्हाने, सपना साखरे, सुषमा आठवले, स्वप्निका गवई व पो.कॉ. अविनाश पोकळे यांनी केली आहे.
नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन
“कमिशन किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले बँक खाते (Mule Account), एटीएम कार्ड, UPI किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. म्युल अकाउंटसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्यांची माहिती तातडीने सायबर पोलिसांना द्या.”
-
सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल?
-
हेल्पलाइन क्रमांक:
1930वेबसाइट: www.cybercrime.gov.in
-




