धुळे जिल्‍ह्यात नरडाणा पोलिसांची धडक कारवाई: तब्बल २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धुळे: धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २२५ किलो अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा आणि वापरण्यात आलेली कार असा एकूण २१,१८,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे, अंमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी रात्रगस्त घालण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.



त्यानुसार, नरडाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. सचिन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार २१ जुलै २०२६ च्या रात्री २३:०० ते २२ जुलै २०२६ च्या सकाळी ०८:०० वाजेदरम्यान रात्रगस्त घालत होते. २२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ३:०० वाजेच्या सुमारास शिरपूरकडून सोनगीरकडे जाणारी एक लाल रंगाची टाटा आरिया प्रेस्टीज कार (क्रमांक: MH-02/CD-0727) संशयीत रीतीने भरधाव वेगाने जात असल्याचे पोलिसांना दिसले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी चालकाला कार थांबवण्याचा इशारा केला; मात्र चालकाने कार न थांबवता पळ काढला. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. कार सारवे गावाच्या दिशेने गेली. सारवे गावचे पोलीस पाटील  विवेक भागवत सोनवणे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता, सारवे मराठी शाळेजवळील एका शेतात ही कार आढळून आली. अंधाराचा फायदा घेऊन कारचा चालक तेथून पसार झाला होता.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

पोलीस पथकाने वाहनाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये खालील मुद्देमाल मिळून आला:

क्र. मुद्देमालाचे वर्णन अंदाजे किंमत (रु.)
२२५ किलो ८३५ ग्रॅम अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा (अंमली पदार्थ)

११,१८,०७५/-



टाटा आरिया प्रेस्टीज कार (क्रमांक: MH-02/CD-0727)

१०,००,०७५/- (अंदाजे १० लाख रुपये)

दुसरं बनावट नंबर प्लेट (MP-09/ZQ-8382) चे २ नग

००.००/-



एकूण हस्तगत केलेला एकूण मुद्देमाल

२१,१८,०७५/-

गुन्हा दाखल व पुढील तपास:

मानवी मेंदूवर गंभीर आणि विपरीत परिणाम करणाऱ्या या अंमली पदार्थांची अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गु.र.नं. १३१/२०२६ अन्वये ‘गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) च्या कलम ८ (क) व १५ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या अज्ञात कार चालकाचा नरडाणा पोलीस वेगाने शोध घेत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!