अमरावती शहर पोलिसांची धडक कारवाई: ४२ लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज आणि स्विफ्ट कार जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती

गुन्हे शाखा, अमरावती शहर येथील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील एक गुन्हेगार आपल्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून मेफेड्रान (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी ताजनगर परिसरात येणार आहे.अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ०१ ने अंमली पदार्थ विरोधी मोहीमेअंतर्गत धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थासह रंगेहात पकडले आहे. पाटीपुरा परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी २१४ ग्रॅम (०.२१४ किलोग्रॅम) मेफेड्रान (एम.डी.) नावाचा अत्यंत घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक २२ जुलै २०२६ रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाटीपुरा येथे सापळा रचला. संशयित गाडी थांबवून अंगझडती घेतली असता आरोपीकडे अमली पदार्थ आढळून आले. सदर ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याची कबुली आरोपीने दिली.या प्रकरणी आरोपीविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS Act) च्या कलम ८ (क), २१ (क), २२ (क), आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



ताब्यात घेतलेला आरोपी:

  • नाव: सईद खान शरीफ खान

  • वय: ४१ वर्षे



  • राहणार: पाटीपुरा, अमरावती

    जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹५०,९९,०००/-):

    अनुक्रमांक मुद्देमालाचा तपशील अंदाजे किंमत
    २१४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज (झीपलॅक प्लास्टिक पाऊचमध्ये) ₹ ४२,८०,०००/-
    लाल रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक: MH 40 CA 2191) ₹ ८,००,०००/-
    १ Vivo कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल ₹ १५,०००/-
    २ Jio Bharat की-पॅड मोबाईल ₹ ४,०००/-

    मार्गदर्शन व कारवाई पथक:

    सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके  पोलीस उपआयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे (मुख्यालय), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) कैलास पुंडकर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त  ब्राम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



    कारवाई पथक:

  • पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, अतुल वर; सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, दशरथ आडे; स.पो.उप.नि. फिरोज खान; पोलीस अंमलदार संभाजी केंद्रे, मंगेश लोखंडे, नाझीमुद्दीन सैयद, रणजित गावंडे, नरेश मोहरील, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, सागर ठाकरे, वर्षा घोंगडे, सुधीर गुढधे, तसेच वाहन चालक नरेंद्र बुरंगे व प्रभात पोकळे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!