
अकोट पोलिसांचा धडक प्रहार: २९.५ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त
अकोट येथे पोलिसांची धडक कारवाई: २९,५४,२०४ रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा व वाहन जप्त
अकोला / अकोट:
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला (गुटखा) आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अकोट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी १७,५४,२०४ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू तसेच १२,००,००० रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २९,५४,२०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय घडली?
२९ जुलै रोजी रात्री सुमारे ०१:१५ वाजता सहायक पोलीस अधीक्षक श्री. निखील पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली. एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनातून अकोट मार्गे दर्यापूर रोडने शासन प्रतिबंधित पानमसाला (गुटखा) व सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
सहायक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक फौजदार श्री. शाम बुंदेले, पोलीस कर्मचारी आणि आर.सी.पी. अमलबदारांनी दोन पंचांसमक्ष दर्यापूर रोडवरील कोल्हे हॉस्पिटलजवळ नाकाबंदी केली.

चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न
नाकाबंदीदरम्यान अकोला नाक्यावरील पुलावरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन थांबवले, मात्र संशय आल्याने अंधाराचा फायदा घेऊन तो घटनास्थळावरून पळून गेला.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची कसून झाडाझडती घेतली असता वाहनामध्ये:

-
वाह (Wah)
-
विमल (Vimal)

-
पान पराग (Pan Parag)
-
पान बहार (Pan Bahar)
या नामांकित कंपन्यांचा बंदी असलेला पानमसाला आणि सुगंधी तंबाखू आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई
या प्रकरणी पोउपनि शामकुमार बुंदेले यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे खालील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
भारतीय न्यायसंहिता (BNS): कलम १२३, २२३, २७४, २७५
-
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६: सहकलम २६(१), २६(४), २७(३)(डी), २७(३)(ई), २७(२)(अ)
सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अचित चांडक, अपर पोलीस अधीक्षक व्ही. चंद्रकांत रेड्डी, आणि सहा. पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पथकातील अधिकारी व कर्मचारी:
-
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट: वाचक फौजदार शामकुमार बुंदेले, पोहेकॉ बजरंग इंगळे, पोहेकॉ अनिल सिरसाट, पोहेकॉ गोपाल निमकर्डे, पोकों अक्षय ढेपे.
-
आर.सी.पी. प्लाटून: पोकों रामेश्वर घंघाळ, राहुल ठाकुर, सै. चांद मुन्शी, राम अहीरकर.




