
अमरावती: घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या;३ गुन्हे उघडकीस, रोख रक्कम जप्त
अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे ३ गुन्हे उघड, रोख रक्कम जप्त
अमरावती (विशेष प्रतिनिधी):
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना राजापेठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेऊन घरफोडीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस स्टेशन राजापेठ येथे नोंदवलेल्या अपराध क्र. ५१६/२०२६ (कलम ३०५ (अ) भा.न्या.सं.) या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.

यातील मुख्य आरोपी तेजस पंडित याने अधिक चौकशीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनेरा रोड येथील मनभरी फूड मार्ट आणि जय दुर्गा किराणा (राजापेठ क्रॉसिंगजवळ) येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात आधीच नोंद असलेले खालील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत:
-
अपराध क्र. २०३/२०२६ (कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं.)

-
अपराध क्र. ४३०/२०२६ (कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं.)
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. तेजस गणवीर पंडित (वय २२ वर्षे, रा. नगीना मस्जिद जवळ, फ्रेजरपुरा, अमरावती)

२. संकेत रामदास धोटे (वय १९ वर्षे, रा. झाडीपुरा, नेर परसोपंत, जि. यवतमाळ)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
-
नमूद तिन्ही गुन्ह्यांतील घटनास्थळावरून चोरी केलेले ₹२०,००० (वीस हजार रुपये) रोख पोलिसांनी जप्त केले आहेत.

कारवाई पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परि. ०२) श्याम घुगे, आणि सहायक पोलीस आयुक्त (राजापेठ विभाग) संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-
नेतृत्व: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण
-
तपास अधिकारी व पथक: पोलीस निरीक्षक उमेश मुंढे (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे तसेच पोलीस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवी लिखितकर, शशीकांत शेळके, अंकुश काळे, प्रशांत बेलोकर, आकाश यादव, अमोल खंडेझोड, रफीक खान, पंकज गाठे, अमोल देशमुख आणि अर्जुन कदम.




