गोंदिया हत्या प्रकरण: जुन्या वादातून हत्येचा उलगडा, ३ अल्पवयीन ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया :-

गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडीपार स्मशान घाट परिसरात झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलीस ठाणे गंगाझरी आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) Gondia च्या संयुक्त पथकाला यश आले आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून दारू पिण्याच्या बहाण्याने नेऊन मोहम्मद इक्बाल शहा फकीर यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (अल्पवयीन) ताब्यात घेण्यात आले आहे.



घटनेची पार्श्वभूमी

  • मृत व्यक्ती: मोहम्मद इक्बाल शहा फकीर (रा. फकीरटोली, काचेवाणी).

  • तक्रारदार: नुरी इकबाल फकीर (वय ४० वर्ष, रा. फकीरटोली, काचेवाणी).



  • घटनाक्रम: दिनांक ०९/०८/२०२६ रोजी बेरडीपार येथील स्मशान घाट परिसरात मोहम्मद इक्बाल शहा यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. तक्रारीवरून गंगाझरी पोलीस ठाण्यात सुरुवातीला मर्ग दाखल करण्यात आला होता.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

मर्ग संशयास्पद असल्याने गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गंगाझरी पोलिसांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.



  • गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे मौजा काचेवानी आणि गोंडीटोला (कुडवा) परिसरातील तीन अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • पोलिसी चौकशीदरम्यान तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.



  • जुन्या वादाचा व वैमनस्याचा कट रचून, ०८/०८/२०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास मृत मोहम्मद इक्बाल यांना दारू पिण्याच्या बहाण्याने बेरडीपार स्मशान घाटाजवळ नेण्यात आले.

  • तेथे त्यांच्या मान (गळा) व पाठीवर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई

गंगाझरी पोलीस ठाण्याचे परि. पोउपनि अजित धाराव यांच्या चौकशी अहवालावरून गंगाझरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१), ६१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

तपास पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तिरोडा) गुल्हाने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  • गंगाझरी पोलीस ठाणे पथक: स.पो.नि. धीरज राजूरकर (ठाणेदार), पो.उप.नि. धाराव, परि. पोउपनि गवई, तसेच अंमलदार भुरे, देशपांडे, कावळे, कटरे, राऊत, नागपुरे, जनेवार, गौतम, चांदेवार व बघेले.

  • स्थानिक गुन्हे शाखा पथक: सफौ राजू मिश्रा, पो.हवा. सोमेन्द्रसिंग तुरकर, रियाज शेख, महेश मेहर, भोजराज बहेकार, इंद्रजित बिसेन, राजकुमार खोटेले, सुजित हलमारे, तसेच पोलीस शिपाई हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, मुरली पांडे आणि इम्रान शेख.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!